S M L

मोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी

मोबाईल फोनची जुनी बँटरी निकामी समजुन दगडाने फोडत असताना आचानक स्फोट झाल्याने दोन मुले जखमी झाले आहेत.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 25, 2018 04:29 PM IST

मोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी

23 एप्रिल : मोबाईल फोनची जुनी बँटरी निकामी समजुन दगडाने फोडत असताना आचानक स्फोट झाल्याने दोन मुले जखमी झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात ही घटना घडली. बौध्दपुरा येथील 16 वर्षीय सिद्धार्थ भवरे आणि त्याचा भाऊ 10 वर्षीय शिवम भवरे हे दोघे घरासमोरील आंगणात खेळत होते.

खेळत असताना त्यांच्या हाती मोबाईल फोनची जुनी बॅटरी लागली. कुतूहला पोटी बॅटरीशी खेळत असताना सिद्धार्थ याने त्या बॅटरीस दगडाने ठेचण्यास सुरुवात केली. अचानक त्या बॅटरीचा मोठा स्फोट झाला.

यामध्ये सिद्धार्थच्या उजव्या भागाच्या तोंडाचा जबडा स्फोटात छिन्न विछिन्न होऊन कान, खांदा आणि छातीला गंभीर दुखापत झाली. तर सोबत खेळत असलेला शिवम यांच्या उजव्या हाताच्या करंगळी आणि आंगठ्याला छिद्र पडलं आहे.

स्फोटाचा अवाज एकुण त्याच्या वडीलासह शेजाऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. रक्तबंबाळ जालेल्या सिद्धार्थ आणि शिवमला तात्काळ ग्रामिण रुग्णालयात नेण्यात आलं. दरम्यान त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 23, 2018 08:59 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close