News18 Lokmat

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंना मुजोर टोल कर्मचाऱ्यांकडून मारहाण

लोकसभा निवडणुकीचे कामकाज आटोपून निघालेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि मुख्य लेखा-वित्त अधिकारी राहुल कदम यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 10, 2019 11:20 AM IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंना मुजोर टोल कर्मचाऱ्यांकडून मारहाण

कोल्हापूर, 10 एप्रिल : लोकसभा निवडणुकीचे कामकाज आटोपून निघालेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि मुख्य लेखा-वित्त अधिकारी राहुल कदम यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोमवारी (8 एप्रिल) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास किणी टोल नाक्यावर ही घटना घडली आहे. याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमन मित्तल आणि राहुल कदम इस्लामपूरला निवडणुकीच्या कामकाजानिमित्त गेले होते. काम आटोपल्यानंतर ते रात्री उशिरा कोल्हापूरला येण्यासाठी निघाले. यावेळेस किणी टोल नाक्याच्या लेन क्रमांक सातवर टोल कर्मचाऱ्यानं त्यांची गाडी अडवली आणि टोल देण्याची मागणी केली. यावर, मित्तल यांनी आम्ही शासकीय अधिकारी असून शासकीय गाडीतून प्रवास करत असल्याचे सांगत टोल देण्यास नकार दिला.अधिकाऱ्यांनी आपले ओळखपत्र दाखवल्यानंतरही टोल कर्मचाऱ्यानं त्यांच्यावर टोल भरण्याची जबरदस्ती केली.

हे प्रकरण इथंच थांबलं नाही तर मुजोर टोल कर्मचाऱ्यांनी मित्तल यांना आम्ही तुमच्यासारखे दहा अधिकारी विकत घेऊ शकतो, असं म्हणत शिवगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर मित्तल यांनी वडगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.

वाचा अन्य बातम्या

‘ब्रेस्ट इम्प्लांट’मुळे आजही चर्चेत आहे सलमानची ही अभिनेत्री

VIDEO: राहुल गांधींचा बायोपिक करणार का सुबोध भावे?

Loading...

चेहरा बदलून बाइकवरून फिरतेय दीपिका पदुकोण, 'छपाक'च्या शूटिंगचा VIDEO व्हायरल

एअर स्ट्राईक ते राफेल करार, मोदींची UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 10, 2019 09:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...