News18 Lokmat

सुसाट... इलेक्ट्रिक बाईकमुळं या खेड्यानं संपवली पेट्रोलची गरज! 

सांगली जिल्ह्यातल्या या गावामध्ये एक वर्षापूर्वी एकच ई बाइक एका तरुणाने आणली होती. त्याचा फायदा लक्षात आल्यानं आता गावामध्ये तब्बल दोनशे ते सव्वादोनशे बाईक्स आहेत.

News18 Lokmat | Updated On: Nov 15, 2018 01:06 PM IST

सुसाट... इलेक्ट्रिक बाईकमुळं या खेड्यानं संपवली पेट्रोलची गरज! 

आसिफ मुरसल, ता.14 नोव्हेंबर : सध्या महागाई आणि पेट्रोलचे वाढते दर पाहता सर्व सामान्यचे कंबरडे मोडले आहे. मात्र यावर सांगलीजवळच्या लिंगनूर गावातील शेतकऱ्यांनी आणि युवकाने नामी शक्कल लढवत ई बाईक या बॅटरीवर चालणाऱ्या बाईकचा वापर सुरू केला आहे. आणि पेट्रोलला गावातून तडीपार केले आहे. या गावामध्ये तब्बल 200 बाईक हे शेतकरी कमी पैशांमध्ये फिरवत आहेत. आणि गावची पेट्रोलची गरजही एकदम कमी झालीय.


पेट्रोलने भाव सतत वाढत असल्याने सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना परवडत नाही. मात्र याला सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील लिंगनूर या गावातील शेतकऱ्यांनी आणि तरुणांनी पर्याय शोधून काढला आहे. गावामध्ये एक वर्षापूर्वी एकच ई बाइक एका तरूणाने आणली होती. त्याचा फायदा लक्षात आल्यानं आता गावांमध्ये तब्बल दोनशे ते सव्वादोनशे या बाईक्स या गावांमध्ये आहेत.


मिरज तालुक्यातील लिंगनूर हे गाव कर्नाटकसीमेजवळच्या शेवटच्या टोकावर वसलंय. या गावची लोकसंख्या 5 हजार 200 इतकी आहे. हे गाव दुष्काळ भागात येतं. या भागात पाण्याची तीव्र टंचाई भासत असते. आणि गावाच्या आसपास पेट्रोल पंप नसल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना पेट्रोल भरण्यासाठी आठ ते दहा किलोमीटर लांब जावं लागतं.

Loading...


त्यातच पेट्रोलचे वाढते दर आणि दुसरीकडे दुष्काळ याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी ई बाईक चा वापर सुरू केलाय. त्यामुळं प्रदूषण कमी झालं आणि पर्यावरणाचं रक्षणही झालं.


शेतकरी या बाईकचा वापर दूध घेऊन जाणं, शेतीची लहान मोठी कामं, पेंडीचे पोते, चारा अश्या अनेक कामासाठी करत आहेत. पेट्रोल भरण्याची संपलेली गरज, किमान पैशांमध्ये होणारं चार्जिंग आणि देखभालीचा वाचलेला त्रास यामुळं या गाडीची लोकप्रियता झपाट्याने वाढलीय.


या ई बाईकला 6 तास चार्जिंग करावं लागतं. यासाठी दोन युनिट वीज लागते आणि एकदा चार्जिंग केल्यावर ही गाडी 60 ते 90 किलोमीटर धावू शकते. तब्बल 200 किलो वजन नेण्याची या गाडीची क्षमता आहे. या गाडीची किंमत 30 हजार पासून 70 हजार पर्यंत आहे. ईलेक्ट्रीक गाड्यांचा वापर करून लिंगनुरनं एक नवा आदर्श स्थापन केलाय.

VIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 15, 2018 12:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...