News18 Lokmat

कर्जाच्या बोज्याला कंटाळून दोन तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सततचा दुष्काळ नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे बीड जिल्ह्यात दोन तरुण शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं.

News18 Lokmat | Updated On: Jul 23, 2019 05:35 PM IST

कर्जाच्या बोज्याला कंटाळून दोन तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सुरेश जाधव 23 जुलै : सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे बीड जिल्ह्यात दोन तरुण शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं. जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्या थांबायचं नाव घेतं नाही. यामुळे चिंता व्यक्त केली जातेय. वडवणी तालुक्यांतील देवडी येथील नागेश भिकाजी नाईकवाडे (25) आणि धारूर तालुक्यांतील योगेश किशन राठोड (20) या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

नागेश नाईकवाडेवर काही हजारांचं कर्ज होतं. ते फेडणं त्याला शक्य होत नव्हतं. पावसाचा लहरीपणा, मालाला नसलेला भाव आणि नापीकीने तो त्रस्त झाला होता. सकाळी सहा वाजता शेतात गेला असताना विषारी औषध प्राशन करुन त्याने आत्महत्या केली. नागेश याच्यामागे पाच भाऊ, एक बहीण व आई-वडील असा परिवार आहे.

मंत्रिडळाने घेतले तीन महत्त्वाचे निर्णय, निवडणुका जवळ आल्याने घोषणांचा पाऊस

नागेशला शेतातून घरी यायला उशीर झाल्याने त्याचे वडील पहायला गेले असता. जनावरांच्या गोठ्यात अत्यवस्थ अवस्थेत होता. नागेश दिसून आला त्याला तत्काळ बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले पण तोपर्यंत नागेशची प्राणज्योत मावळली होती. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं घोषीत केलं. आर्थिक विवंचना व नापिकी यामुळे विष घेतल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं.

VIDEO: विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहारच ठरतोय जीवघेणा!

Loading...

तर दुसरी घटना धारूर तालुक्यांतील मोहखेड धनखिळा तांडा येथे घटली. योगेश किशन राठोड या 20 वर्षांच्या तरुणाने आर्थिक विवंचनेतून शेतात गळफास घेवून जीवन संपवले. त्याचे आंबेजोगाई येथे Bsc चे शिक्षण सुरु होते. मागच्या वर्षी शेतात काही पिकले नाही. कॉलेज सोडून ऊस तोडणीला जावं लागले या वर्षी सुध्दा तशीच वेळ येते की काय? असं त्याला सारखं वाटतं होतं. त्यांतच घरातलं दारिद्र यामुळे आर्थिक विवंचनेतून गळफास घेतल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 23, 2019 05:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...