कर्जाला कंटाळून शेतकरी भावांची आत्महत्या

शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी त्यांनी बँकांकडून कर्ज काढलं होतं. पण बँकांचा कर्जवसूलीचा ताण सहन न झाल्यानं, या दोघांनीही आत्महत्या केली.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 4, 2017 03:36 PM IST

कर्जाला कंटाळून शेतकरी भावांची आत्महत्या

04 मार्च  :  कर्जाला कंटाळून दोन सख्या भावांनी आत्महत्या केल्याची घटना रात्री साताऱ्यातील वाडगाव हवेली इथे घडली. विशेष म्हणजे हे दोघेही शेतकरी उच्च शिक्षित होते. शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी त्यांनी बँकांकडून कर्ज काढलं होतं. पण बँकांचा कर्जवसूलीचा ताण सहन न झाल्यानं, या दोघांनीही आत्महत्या केली.

कराड तालुक्यातील वडगाव हवेली इथल्या जगन्नाथ चव्हाण आणि विजय चव्हाण या उच्च शिक्षित असलेल्या शेतकऱ्यांनी शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी कराडमधील दोन बँकांकडून एकूण 60 लाख रूपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र शेती आणि व्यवसायातील तोट्यामुळे चव्हाण कुटुंब गेली अनेक दिवस अडचणी होते.

बँकेकडून कर्ज वसूलीचा वाढता ताण सहन न झाल्याने विजय चव्हाण यांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्यानंतर थोरलेबंधू जगन्नाथ शिंदे यांनी कराड ओगलेवाडी रेल्वे रूळावर आत्महत्या केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2017 01:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...