मलकापुरात भरधाव ट्रकने इंदूरमधील दोघांना चिरडले, जागीच मृत्यू

मलकापुरात भरधाव ट्रकने इंदूरमधील दोघांना चिरडले, जागीच मृत्यू

मलकापूर नॅशनल हायवे क्रमांक सहावर वाघूरजवळ बजरंग दाल मिलसमोर भरधाव ट्रकने दुचाकीस चिरडल्याने दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले.

  • Share this:

इम्तियाज अहमद (प्रतिनिधी)

भुसावळ, 12 जुलै- मलकापूर नॅशनल हायवे क्रमांक सहावर वाघूरजवळ बजरंग दाल मिलसमोर भरधाव ट्रकने दुचाकीस चिरडल्याने दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. दुचाकीस 200 मीटर घासत नेत ट्रकचालक ट्रक घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजेदरम्यान घडली.

बजाज पल्सर दुचाकीने दोघे मलकापूरवरून नांदूऱ्याकडे जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वारांना चिरडून ट्रकने दुचाकीस 200 मीटरपर्यंत घासत नेले. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्यादरम्यान मृतकाच्या खिशात असलेल्या कागदपत्रावरून विरेंद्र सिंग राजपूत, बलराम सिंग राजपूत, (दोघे रा. पटोली, जि.ताजापूर (इंदूर, मध्य प्रदेश) असल्याचे समजले. गावकऱ्यांच्या मदतीने अॅम्बुलन्समधून दोघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

नागपुरात अवैध उत्खनन.. मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबून 3 मजुरांचा मृत्यू

कन्हान येथे अवैध माती उत्खनन करणाऱ्या तीन मजुरांचा मातीखाली दाबून मृत्यू झाला आहे. कन्हैय्या हरजन, गंगा जलहारे आणि शिवकुमार मनहारे असं मृत मजुरांची नावं आहेत. कन्हान भागातील वेकोली परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध माती उत्खनन सुरू होते. शु्क्रवारी सकाळी माती टॅक्टरमध्ये भरून हे मजूर 20 ते 25 फुट उंच मातीच्या खड्ड्यात बसले होते. मात्र पावसामुळे माती ओली असल्याने अचानक माती खचली. या मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबून तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. नागरिकांचा रोष बघता वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी मृत्यू झालेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना 20 हजार रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली आहे. मात्र, या घटनेमुळे या परिसरात अवैध माती उत्खननाचा प्रश्न पून्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

'बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल', देवकी पंडित यांच्या गाण्यातून पांडुरंगाला साद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2019 04:59 PM IST

ताज्या बातम्या