ताम्हिणी घाटाजवळ खोल दरीत कारमध्ये 2 जळालेले मृतदेह सापडले

ताम्हिणी घाटाजवळ खोल दरीत कारमध्ये 2 जळालेले मृतदेह सापडले

मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटाजवळ असलेल्या खोल दरीत कारमध्ये दोन जळालेले मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

  • Share this:

पुणे, 4 जुलै- मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटाजवळ असलेल्या खोल दरीत कारमध्ये दोन जळालेले मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह 90 टक्के जळालेले असून विजय आबा साळुंके (वय-35, मु.पो.बांदा, जि.सिंधुदुर्ग) व विकास विलास गोसावी ( वय-32, मु.पो. निपाणी, जि.बेळगाव, राज्य कर्नाटक) मृतांची नावे आहेत. हा घातपात असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. दोघेची घरातून बेपत्ता असल्याची तक्रार माणगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. पुढील तपास पोलीस करत आहेत.

काळिमा..नोकरीसाठी आलेल्या भाचीवरच दोन मामांनी केला बलात्कार

मानवतेला काळिमा फासणारी घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. नोकरीसाठी आलेल्या 19 वर्षीय तरूणीवर तिच्या दोन सख्या मामांनी बलात्कार केला आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही नराधमांना अटक केली आहे. अब्दुल्ला खान व शाहरुख खान अशी दोन्ही बलात्कारी मामांची नावे आहेत. पीडिता तरुणी आणि आरोपी उत्तरप्रदेशातील रहिवासी आहेत.

मिळालेली माहिती अशी की, दोन मामांनी सख्या भाचीला धमकावत तब्बल वर्षभर बलात्कार केला. सततच्या या प्रकाराला कंटाळून पीडितेने वडिलांना फोन करून आपबिती सांगितली. पीडितेच्या वडिलांनी थेट औरंगाबाद गाठून आरोपींच्या तावडीतून पीडितेची सुटका केली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

VIDEO:वामन हरी पेठेतून तब्बल 27 कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2019 11:08 PM IST

ताज्या बातम्या