धुळे जिल्ह्यात वीज कोसळून दोन मुलांचा जागेवरच मृत्यू, म्हैसही दगावली

धुळे जिल्ह्यात वीज कोसळून दोन मुलांचा जागेवरच मृत्यू, म्हैसही दगावली

तब्बल 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर विजांच्या कडकडाटासह राज्याच्या बहुतांश भागात शनिवारी जोरदार पाऊस झाला. धुळे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने दोन मुलांचा बळी घेतला आहे.

  • Share this:

दीपक बोरसे, (प्रतिनिधी)

धुळे, 20 जुलै- तब्बल 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर विजांच्या कडकडाटासह राज्याच्या बहुतांश भागात शनिवारी जोरदार पाऊस झाला. धुळे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने दोन मुलांचा बळी घेतला आहे. त्यात 15 वर्षीय मुलीचा समावेश आहे.

शिंदखेडा तालुक्यात वीज पडून दीपाली दगडू गिरासे या मुलीचा मृत्यू झाला. दीपाली ही खर्डे बुद्रुक गावातील रहिवाशी होती. दरम्यान, दुसरी घटना पाडळसे येथे घडली आहे. पाडळसे येथे वीज पडून पंकज राठोड या 10 वर्षीय मुलाचाही मृत्यू झाला आहे. पंकजचे दोन चुलत भाऊ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत इंद्रजीत मदन राठोड यांची एक म्हैसही दगावली आहे. हितेश संतोष राठोड (10) आणि आनंद (लखन) दत्तात्रय राठोड (6) अशी जखमींची नावे आहेत.

धुळे तालुक्यातील पाडळदे शिवारात वीज पडून पंकज ज्ञानेश्वर राठोड याचा जागेवरच मृत्यू झाला. तो आपल्या चूलत भावांसोबत शेतात खेळत असतानाच अचानक वीज कोसळली. यात पंकजचे दोन चुलत भाऊ जखमी झाले. तर या दुर्घटनेत एक म्हैसही दगावली आहे. इयत्ता चौथीत शिकणारा पंकज आपल्या भावंडासोबत शाळा सुटल्यानंतर शेतात गेला होता. यावेळी शेतात पंकजचे आई-वडील काम करत होते तर पंकज भावंडांसोबत झाडाखाली खेळत होता. यावेळी अचानक सुरु झालेल्या पावसात वीज अंगावर कोसळल्याने पंकजचा जागेवरच मृत्यू झाला तर त्याचे इतर दोन भावंड जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संपूर्ण जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवलेली असताना अवघ्या पंधरा मिनिटं पडलेल्या पावसात कोसळलेल्या विजेने पंकजचा बळी घेतला आहे. या दुर्दवी घटनेने पाडळदे गावावर शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती मधुकर गर्दे, अशोक सुडके व गोकूळसिंग राजपूत यांनी मृत व जखमींच्या पालकांची भेट घेतली. त्यांचे सात्वन केले. मृत मुलाच्या व जखमींच्या पालकांना तातडीने आर्थिक मदत देण्याची सूचना आमदार कुणाल पाटील यांनी तहसीलदार किशोर कदम यांना दिल्या आहेत. धुळे तालुक्यातील प्रत्येक गावात वीज प्रतिरोधक यंत्र बसवावेत, अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे.

SPECIAL REPORT:सांगलीच्या 'गज्या'ने मालकाला केलं कर्जातून मुक्त!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2019 09:04 PM IST

ताज्या बातम्या