हत्येचं गूढ उकललं..दारुच्या नशेत शिविगाळ केल्याने मित्रांनीच मित्राला दगडाने ठेचलं

शेगाव शहरातील रेल्वेगेटजवळ 12 मे रोजी राजेश उर्फ गणेश गजानन बोदडे (वय-25, रा. शेगाव) या तरुणाचा मृतदेह आढळला होता. राजेशची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. या हत्येचे गुढ आता उकललं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 18, 2019 07:53 PM IST

हत्येचं गूढ उकललं..दारुच्या नशेत शिविगाळ केल्याने मित्रांनीच मित्राला दगडाने ठेचलं

अमोल गावंडे, (प्रतिनिधी)

बुलडाणा, 18 मे- शेगाव शहरातील रेल्वेगेटजवळ 12 मे रोजी राजेश उर्फ गणेश गजानन बोदडे (वय-25, रा. शेगाव) या तरुणाचा मृतदेह आढळला होता. राजेशची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. या हत्येचे गूढ आता उकललं आहे. पोलिसांनी दोन आरोपींना सातारा रेल्वेस्टेशन येथून ताब्यात घेतले आहे. राजेशच्या हत्येची कबुलीही दोन्ही आरोपींनी दिली आहे. विशेष म्हणजे आरोपी हे राजेशचे मित्र आहेत. राजेशने दारुच्या नशेत शिविगाळ केल्याचा राग आल्याने दोन्ही मित्रांनी त्याला शहराबाहेर नेऊन त्याची दगडाने ठेचून हत्या केली.

सूडाने पेटलेल्या माथेफिरूने विहिरीच्या पाण्यात टाकले विष, संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न

काय आहे हे प्रकरण?

एका खुनाच्या प्रकरणात आरोपी असलेल्या राजेश उर्फ गणेश गजानन बोदडे या तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी शेगावात उघडकीस आली होती. तो मंदिर परिसरात राहत होता. त्याच्यावर काही वर्षांपूर्वी क्षुल्लक कारणावरून एका भिकाऱ्याला ठार मारल्याचा आरोप होता. नुकताच तो जेलमधून जामिनावर सुटून बाहेर आला होता. रेल्वेचे काही कर्मचारी जानोरी गेटजवळ गेले असता तरुणाचा मृतदेह रस्त्यावर पडलेला आढळून आला होता. या गुन्ह्यात राहूल उर्फ लाशा समाधान रावंणचोरे (वय-22, रा.जयपूर कोथळी, ता.मोताळा, ह.मु. रेल्वेस्टेशन शेगाव) व लालू उर्फ बुऱ्या इमरत वाडे (वय-20, रा.देशमुख फैल, अकोला. ह. मु. रेल्वेस्टेशन शेगाव) या दोघांनी राजेशची हत्या करुन फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Loading...

सोलापुरातील आधुनिक भगीरथ..गावाला पाणी देण्यासाठी त्याने विकले आईचे दागिने

शेगाव शहर ठाणेदार सुनील हुड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पीएसआय व्ही.एस.आरसेवार व त्यांच्या पथक कर्मचारी यांनी आरोपींचे लोकेशन मुंबईकडे मिळाल्यावर तेथे जाऊन शोध घेतला. मात्र आरोपी तेथे मिळून आले नाहीत. त्यानंतर सदर आरोपी सातारा रेल्वेस्थानकवर असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तेथे जाऊन सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन शेगावला आणले. आरोपींना शेगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


VIDEO : केदारनाथमध्ये पंतप्रधान मोदींची ध्यानसाधना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2019 06:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...