तूर राहिली बाजूला डोक्यावर आला 50 हजाराच्या बिलाचा बोझा

रंगनाथ आजोबा तूर विकायला गेले होते. पण तूर विकणं त्यांच्या जिवावरच बेतलं. रांगेत उभं असताना त्यांना चक्कर आली आणि ते कोसळून पडले. पडल्यामुळे त्यांच्या कंबरेतलं एक हाड मोडलं.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 27, 2017 09:37 PM IST

तूर राहिली बाजूला डोक्यावर आला 50 हजाराच्या बिलाचा बोझा

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद

27 एप्रिल : तूर विकायला गेले आणि जिवावर बेतलं अशी अवस्था झालीये पैठणच्या रंगनाथ अल्हाड या शेतकऱ्याची...त्यांची तूर विकली गेली नाहीच..उलट उपचाराचा पन्नास हजारांचा खर्च देण्यासाठी त्यांना कर्ज फेडावे लागणार आहे.

हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले हे आहेत रंगनाथ अल्हाड.... रंगनाथ आजोबा तूर विकायला गेले होते. पण तूर विकणं त्यांच्या जिवावरच बेतलं. रांगेत उभं असताना त्यांना चक्कर आली आणि ते कोसळून पडले. पडल्यामुळे त्यांच्या कंबरेतलं एक हाड मोडलं. हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन आणि उपचाराचा खर्च पन्नास हजारांवर गेला. उपचाराच्या पैशांसाठी त्यांनी पुन्हा कर्ज काढलं.

नाफेडनं त्यांची तूर खरेदी केलीच नाही शिवाय त्यांच्या उरावर हॉस्पिटलचा खर्च बसला. एवढं होऊन रंगनाथ आजोबांच्या नातू सरकार तूर खरेदी करेल या आशेवर आहे.

पिकलं नाही तेव्हाही शेतकऱ्याची अडवणूक सुरू होती. आणि आता पिकलं तर सरकार विकत घ्यायला तयार नाही. हे सगळे सरकारला दिसत नसेल तर सरकारला लोकप्रतिनिधी म्हणून सरकार चालवण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही अशी चर्चा आता शेतकऱ्यांमध्ये आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2017 09:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...