तुकोबांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 13, 2017 09:33 AM IST

तुकोबांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी

अनिस शेख, देहू

13 जून : आषाढीवारीसाठी देहूनगरीत जोरदार तयारी सुरू आहे. तुकोबारायांचा पालखी रथ वारीसाठी तयार करण्यात आला आहे.

जगतगुरू संत तुकोबारायांच्या आषाढी वारीचा पालखी प्रस्थान सोहळा काही दिवसांवरच येऊन ठेपलाय. वारीचा केंद्रबिंदु असलेल्या पालखीचा रथाची साफसफाई सुरू झालीये. रथासोबतच गरुडटक्के, अब्दागिरी, समई, पूजेचं ताट, चौरंग, पाट, सिंहासन, प्रभावळ, मंदिरातील दरवाजे, दरवाजाच्या चौकटी,दानपेट्या, मानाचा चोपदाराचा दंड यांना चकाकी देण्यात आलीये. पालखी रथाला चकाकी देण्यासाठी  चिंचेचा रस, रिठे, लिंबाचा रस यासोबतच इतर रसायनांचा वापर केला जातो. पुण्यातल्या रांका ज्वेलर्सकडून गेल्या वीस वर्षांपासून हे काम विनामोबदला केलं जातं आहे

पालखी रथाचे मानाचे बैलही देहूत पोहचतायेत. दुसरीकडं पालखी रथाला चकाकी देण्याचं कामही झालंय. त्यामुळे कधी प्रस्थान सोहळ्याचा दिवस येतो आणि कधी पंढरपूरसाठी सोहळा प्रस्थान ठेवणार याची आस देहूवासियांना लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2017 09:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...