तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, लोकप्रतिनिधींशी भांडण भोवलं

मुंडे यांची बदली करा अशी भाजपसहीत सर्व पक्षांची मागणी होती. त्यामुळे अखेर त्यांच्या बदलीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं बोललं जातंय.

News18 Lokmat | Updated On: Nov 21, 2018 05:27 PM IST

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, लोकप्रतिनिधींशी भांडण भोवलं

प्रशांत बाग,नाशिक, ता. 21 नोव्हेंबर : नाशिक महापालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर बदली झालीय.  त्यांची जागा राधाकृष्ण गमे घेणार आहेत. गमे सध्या उस्मानाबादचे जिल्हाधिकारी आहेत. आपल्या शिस्तप्रिय शैलमुळं त्यांचं नाशिक महापालिकेतल्या नगरसेवकांशी त्यांचे सातत्यानं वाद होत होते. मुंडे यांची बदली करा अशी भाजपसहीत सर्व पक्षांची मागणी होती. त्यामुळे अखेर त्यांच्या बदलीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं बोललं जातंय.


तुकाराम मुंढे यांची नाशिकमध्ये 11 वी नियुक्ती होती. मुंढे जिथे जातील तिथे धडाक्यात काम करतात. त्यांच्या कामाचा रणगाडा येवढा वेगात असतो की ते कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाहीत त्यामुळं त्याखाली अनेकांचे हितसंबंध चिरडले जातात. त्यामुळं त्यांना सातत्याने विरोध होतो.


नाशिकच्या आधी ते नवी मुंबईत आयुक्त होते. त्याआधी पुण्यात PMPL चे आयुक्त त्याआधी पिंपरी-चिंचवडच आयुक्त होते. त्या सर्व ठिकाणी त्यांनी कणखरपणे काम केलं. जास्त महसूल मिळवून दिला. मात्र त्यांचं कधीच लोकप्रितिनिधींशी जमलं नाही. त्यामुळं प्रशासन विरूद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष सातत्याने बघायला मिळाला. आता मुंढे यांची कुठे बदली होते याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.

Loading...


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2018 04:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...