S M L

तुकाराम मुंढेंनीच रोखला नाशिक पालिकेचा अर्थसंकल्प, सत्ताधारीही संतापले

यावेळी स्थायी समितीमध्ये अर्थसंकल्प मांडूच न दिल्याने अनेक नगरसेवकांनी मुंढेंचा विरोध केला. हे सारं होतं असता महापौरांनी मुंढेंना महासभेत अर्थसंकल्प मांडायची परवानगीच नाकारली.

Chittatosh Khandekar | Updated On: Mar 20, 2018 08:54 PM IST

तुकाराम मुंढेंनीच रोखला नाशिक पालिकेचा अर्थसंकल्प, सत्ताधारीही संतापले

20 मार्च : नाशिक महानगरपालिकेची आजची अर्थसंकल्पीय महासभा चांगलीच वादळी ठरली. स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प सादर न होऊ देता नवनिर्वाचित आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तो महासभेत सादर करण्यास घेतला. यावेळी स्थायी समितीमध्ये अर्थसंकल्प मांडूच न दिल्याने अनेक नगरसेवकांनी मुंढेंचा विरोध केला. हे सारं होतं असता महापौरांनी मुंढेंना महासभेत अर्थसंकल्प मांडायची परवानगीच नाकारली.

कुठल्याही महापालिकेचा अर्थसंकल्प आधी स्थायी समितीमध्ये सभापती सादर करतात त्यावर चर्चा होते आणि मग तो अर्थसंकल्प महासभेत आयुक्त सादर करतात. पण नाशिकच्या स्थायी समितीच्या निवडणुका उशीरा झाल्या आहेत. यासंदर्भात भाष्य करणाऱ्या कलम 35चा आधार घेऊन तुकाराम मुंढेंनी स्थायी समितीत हा अर्थसंकल्प सादर होऊ न देता सरळ महासभेत सादर करायला घेतला.

दरम्यान, मुंढेंनी घेतलेल्या या आधारात एक तांत्रिक चूक होती असा आरोप होतो आहे . त्यातच नाशिकच्या स्थायी समितीच्या सभापती या पहिल्यांदाच महिला आहेत. यामुळे स्थायी समितीत तो पहिल्यांदाच एका महिलेने वाचला असता. पण तो स्थायी समितीत मुंढेंनी वाचूच दिला नाही यामुळे त्यांनी महिलांची गळचेपी केली आहे असा आरोपच त्यांच्यावर सर्व राजकीय पक्षांनी केला. महासभेत अर्थसंकल्प वाचण्यास ते उभे राहिले असताना त्यांनी स्थायी समितीत अर्थसंकल्प मांडू दिला नाही म्हणून नगरसेवकांनी त्यांचा विरोध केला. तर आधी तो स्थायी समितीत मांडला गेला पाहिजे अशी मागणी काही नगरसेवकांनी केली. महासभेत चाललेला गदारोळ पाहता महापौरांनी मुंढेंना बोलण्याची परवानगी नाकारली.पण परवानगी मागितल्यावरही आपल्याला बोलू दिलं नाही याची खंत मात्र मुंढेंना जाणवली. आता यापुढे हा अर्थसंकल्प कधी मांडला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2018 08:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close