S M L

चांदवडच्या टोलनाक्यावर ट्रकने घेतला पेट

Samruddha Bhambure | Updated On: Jun 4, 2017 07:16 PM IST

चांदवडच्या टोलनाक्यावर ट्रकने घेतला पेट

04 जून  : मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या मंगरुळ टोल नाक्यावर ट्रकचे टायर फुटल्याने ट्रकनं पेट घेतला. यात ट्रक यूरिया खताच्या गोणी भरुन जाणारा ट्रक जळून खाक झाला. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

ट्रकला लागलेली आग इतकी भीषण होती की टोलनाक्यालाही आग लागली. आग लागल्यानंतर तातडीनं मनमाड, ओझऱ, मालेगाव, चांदवड, पिंपळगाव या भागातून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सोमा टोल कंपनीच्या वतीनं आग विझवण्याचं काम सुरु आहे.

या घटनेनंतर धुरामुळे मुंबई-आग्रा हायवेवर वाहतूक थांबवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2017 07:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close