नांदेडमध्ये माशांचा ट्रक उलटला आणि लोकांची उडाली एकच झुंबड!

नांदेडमध्ये कामाठा गावात मासे घेऊन जाणारा एक ट्रक उलटला आणि एका नाल्यात हा असा माशांचा सडा पडला.

Sonali Deshpande | Updated On: Jun 10, 2018 04:31 PM IST

नांदेडमध्ये माशांचा ट्रक उलटला आणि लोकांची उडाली एकच झुंबड!

नांदेड, 10 जून : आज नांदेडकरांना माशांची मेजवानी मिळणार. कारण नांदेडमध्ये कामाठा गावात मासे घेऊन जाणारा एक ट्रक उलटला आणि एका नाल्यात हा असा माशांचा सडा पडला.  झोपेच्या धुंदीत चालकाचा ताबा सुटल्याने मासे घेऊन जाणारा ट्रक उलटला.

ही खबर वाऱ्यासारखी गावात पसरली ,आणि मासे लुटण्यासाठी परिसरातील नागरिक तुटून पडले. नांदेड शहराजवळच्या कामठा गावाजवळचं हे चित्र आहे. बंगळुरू इथून मासे घेऊन लखनऊमध्ये जाणारा ट्रक पहाटे नांदेड जवळ पोहचला. कामठा बायपास जवळ चालकाच्या झोपेच्या धुंदीत ट्रक उलटला.

ट्रकमध्ये मंगलुर कॅटफिश मासे होते. जवळपास 8 टन मासे ट्रकमध्ये होते. ट्रक उलटल्याने जिवंत मासे जवळच्या नाल्यात पडले. सकाळी ही बातमी परिसरात पसरली आणि मासे लुटण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 10, 2018 02:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close