मित्राची बर्थडे पार्टी ठरली शेवटची, अपघातात गमावले दोन मित्रांनी जीव

मित्राची बर्थडे पार्टी ठरली शेवटची, अपघातात गमावले दोन मित्रांनी जीव

सोमवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. जितेश कोळी आणि महेश कोळी अशी मृतांची नावे आहेत. दोघे बालपणीचे मित्र होते.

  • Share this:

इम्तियाज अहमद, प्रतिनिधी

जळगाव, 16 ऑक्टोबर : यावल तालुक्यातील किनगाव इथे भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री साडे दहा वाजायच्या सुमारास हा अपघात झाला. जितेश कोळी आणि महेश कोळी अशी मृतांची नावे आहेत. दोघे बालपणीचे मित्र होते.

मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव खुर्द गावातील काही तरुण आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गावाबाहेरील एका हॉटेलमध्ये गेले होते.

सोमवारी रात्री साडे दहा वाजता जितेश ओंकार कोळी (वय-23) आणि महेश दिलीप कोळी (वय-24) हे दोघे दुचाकीवरून (एमएच.19-सीबी.3597) घराकडे परत येत होते.

गावाजवळील चौफुलीवर यावलकडून भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार दोघे रस्त्यावर कोसळले. अपघातात जितेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर महेश कोळीचा जळगाव इथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघात झाल्यानंतर महेश गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान महेशचाही मृत्यू झाला. किनगाव येथे दोन्ही मित्रांवर मंगळवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, अपघात झाला तेव्हा रस्त्यावर ट्रक उभा करून चालक फरार झाला. दोन मित्रांना धडक देऊन चोपडाकडे निघालेला ट्रक (जीजे 06 एएक्स 0799) मंगरूळ फाट्याजवळ लावून चालक पसार झाला.

या अपघाताबद्दल अडावद पोलिसांच्या मदतीने यावल पोलिसांनी सदर ट्रक ताब्यात घेतला आहे. तर यावल पोलिसांत अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण अशा पद्धतीने जितेश आणि महेश यांनी आपले प्राण गमावल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातूनही याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

कहर! तोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2018 05:51 PM IST

ताज्या बातम्या