S M L

ट्रकची भरधाव वेगात येणाऱ्या रिक्षाला धडक, 5 जण जागीच ठार

नागपूरच्या कळमेश्वर-सावनेर मार्गावर एक भीषण अपघात झाला आहे.

Updated On: Sep 20, 2018 06:32 PM IST

ट्रकची भरधाव वेगात येणाऱ्या रिक्षाला धडक, 5 जण जागीच ठार

प्रविन मुधोळकर, प्रतिनिधी

नागपूर, 20 सप्टेंबर: नागपूरच्या कळमेश्वर-सावनेर मार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांनी आपला जीव गमावला आहे. अगदी तासाभरापूर्वी हा ट्रक आणि रिक्षाचा हा अपघात झाला, ज्यात 5 जण ठार झाले आहेत. स्पीडमध्ये येणाऱ्या रिक्षाला ट्रकची जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला तर यात काही जण जखमी झाले आहेत.

हा अपघात घडताच स्थानिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केल. पण यात 4 जणांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. स्थानिकांच्या मदतीने अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून 4 जणांचे मृतदेह ताब्यात घेतलं आहेत तर जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.दरम्यान, हा अपघात कसा झाला याचा आता पोलीस तपास करत आहेत. तर रिक्षामध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. तर रिक्षा भरधाव वेगात असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात आलं आहे. पण या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

VIDEO: 'अल्याड शंकर धुणे धुतो, पल्याड गौराई न्याल ग', शिव्या देण्याची अनोखी प्रथा

Loading...

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 20, 2018 06:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close