अपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण!

अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने 15 ट्रक पेटवून दिल्याची चर्चा होती. पण या प्रकरणात आता नवीनच माहिती समोर येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 17, 2019 07:29 AM IST

अपघात नाही...स्थानिकांनी 15 ट्रक जाळण्यामागे आहे वेगळंच कारण!

गडचिरोलीत बुधवारी भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला.

अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने 15 ट्रक पेटवून दिल्याची चर्चा होती.

या प्रकरणात आता नवीनच माहिती समोर येत आहे.

Loading...

ट्रक जाळण्यामागे अपघात हे कारण नसून इथल्या आदिवासींचा लोहखनिजाच्या उत्खननाला असलेला आधीपासूनचा विरोध हे कारण असल्याची माहिती आहे.

लोहखनिज उत्खननाला स्थानिकांचा आधीपासूनच विरोध होता.

त्यानंतर अपघात हे केवळ निमित्त ठरलं आणि स्थानिकांनी ट्रक जाळत आपला रोष व्यक्त केला.

दरम्यान, आधी अपघात आणि नंतर ट्रक जाळण्याची घटना यामुळे एटापल्लीत तणावाचं वातावरण आहे.

बुधवारी झालेल्या या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे.

ट्रकची धडक बसल्यानंतर बसमधील दहा प्रवासी जखमीही झाले आहेत.

एटापल्लीहून आलापल्लीला जाणा-या बसला सुरजागडकडे लोहखनिज वाहतूक करण्यासाठी जाणा-या ट्रकने धडक दिली.

अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्तांना मदत केली.

जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

अपघात झालेल्या एटापल्ली गावातील लोक संतप्त झालेले पाहायला मिळाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2019 07:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...