S M L

दुसऱ्याला जागा देण्याच्या नादात ट्रकची दुचाकीला धडक, गर्भवती महिला चाकाखाली चिरडली

अकोला जिल्हातल्या पातूर घाटात एक भीषण अपघात झाला आहे.

Updated On: Aug 10, 2018 01:43 PM IST

दुसऱ्याला जागा देण्याच्या नादात ट्रकची दुचाकीला धडक, गर्भवती महिला चाकाखाली चिरडली

कुंदन जाधव,

अकोला, 10 ऑगस्ट : अकोला जिल्हातल्या पातूर घाटात एक भीषण अपघात झाला आहे. घाटात एका ट्रक आणि दुचाकीचा आहे झाला आहे. या दुचाकीवर असणाऱ्या गर्भवती महिलेला ट्रकनं चिरडलं आणि त्यात महिलाचा जागीच मृत्यू झाला आहे. यात महिलेचा पती गंभीर जखमी आहे. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

वैशाली सतीश सोमटकर(२५) रा. मिर्झापूर, ता. मालेगाव, जि. वाशिम असे मृतक महिलेचे नाव आहे. तिचा पती सतीश ज्ञानबा सोमटकर(३०)हा किरकोळ जखमी झाला आहे.सोमटकर दांम्पत्य शुक्रवारी दहा वाजताच्या सुमारास मिर्झापूर तालुका मालेगाववरून पातूर मार्गे अकोला दवाखान्यात  एमएच ३७ एन ०५५१ क्रमांकाच्या दुचाकीने येत होते. पातूरच्या घाटात बंद पडलेल्या कंटेनरमुळे समोरून येणाऱ्या वाहनांना वाट देण्यासाठी सतीश सोमटकर यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी केली. मात्र पाठीमागून येणाऱ्या भरधाव एमएच ३७ पी ५१५१ क्रमांकाच्या ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने त्याने सरळ सोमटकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात वैशाली सोमटकर ह्या  ट्रकच्या मागील चाकात येऊन चिरडल्या गेल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सतीश सोमटकर गंभीर जखमी झाले.

सदर महिला गर्भवती होती अशी माहिती सूत्रांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पातूरचे ठाणेदार डी.सी.खंडेराव यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेऊन जखमी सतीश सोमटकर यांना अकोला येथे उपचारासाठी रवाना केले तसेच मृतक वैशाली यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोल्याला पाठविण्यात आला. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून, घटनास्थळाचा पंचनामा करुन ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2018 01:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close