भिवंडीमध्ये रजिस्टर पोस्टाद्वारे 'तिहेरी तलाक' !

पीडित महिला शबनम हीचे ५ मे २०१६ रोजी सरदार याच्यासोबत मुस्लिम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता.

Sachin Salve | Updated On: Jan 29, 2018 08:31 PM IST

भिवंडीमध्ये रजिस्टर पोस्टाद्वारे 'तिहेरी तलाक' !

29 जानेवारी : एकीकडे मुस्लिम महिलांची तीन तलाकमधून सुटका व्हावी यासाठी केंद्र सरकारने कायदा करण्याची तयारी सुरू केलेली असतानाच दुसरीकडे भिवंडीत एका महिलेला हुंड्यासाठी रजिस्टर पोस्टाने तीन तलाक दिल्याची घटना समोर आली आहे.

पीडित महिला शबनम हीचे ५ मे २०१६ रोजी सरदार याच्यासोबत मुस्लिम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. त्यावेळी हुंडा म्हणून शबनमच्या आईवडिलांनी जावई सरदार यास मोटार सायकल दिली होती. मात्र दुसरी नव्याने मोटार सायकल घ्यावयाची आहे असे सांगून वडिलांकडून नवीन मोटार सायकल अथवा ५० हजार रुपये घेवून ये असा तगादा लावला. मात्र त्यास शबनम हिने नकार दिला. आणि त्यामुळेच तिला पोस्टाने तिहेरी तलाक दिल्याचं समजतंय. तिला क्षुल्लक कारणांवरून त्रास देवून शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला घरातून हाकलून दिले. त्यानंतर पती इसरार याने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर रजिस्टर पोस्टाने तीन तलाक दिले आहे. या घटनेने हतबल झालेल्या शबनम हिने शांतीनगर पोलीस ठाणे गाठून पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिलेने पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पती सरदार मंसुरी ,सासरा इसरार, सासू जुलेखा,दिर रेहान,जाऊ अफरीन असं गुन्हा दाखल केलेल्या सासरच्या मंडळींची नावे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2018 08:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close