जमिनीच्या तुकड्यासाठी सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी, तीन भावांचा केला खून

शेतीच्या वादातून सख्या भावाने आपल्या मुलांच्या मदतीने तीन सख्ख्या भावांची हत्या केल्याची धक्कादायक घटना बीड शहराजवळील पिंपरगव्हाण मार्गावरील गिराम तरफ भागात शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2019 07:54 PM IST

जमिनीच्या तुकड्यासाठी सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी, तीन भावांचा केला खून

बीड, 27 जुलै- शेतीच्या वादातून सख्या भावाने आपल्या मुलांच्या मदतीने तीन सख्ख्या भावांची हत्या केल्याची धक्कादायक घटना बीड शहराजवळील पिंपरगव्हाण मार्गावरील गिराम तरफ भागात शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. जमिनीच्या वादाचे पर्यवसान खुनात झाले तर भांडणात इतर तिघे जखमी झाले आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. किरण काशीनाथ पवणे, प्रकाश काशीनाथ पवणे, दिलीप काशीनाथ पवणे अशी मृतांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील तिघांचा हत्या झाल्याने जिल्हा रूग्णालयात तणावाचे वातावरण आहे. मोठा पोलिस बंदोबस्त असल्याने रुग्णालयाला छावणीचा स्वरूप आले आहे.

बीड शहराजवळच असलेल्या पिंपरगव्हाण रोड परिसरात भावा-भावामधील शेतीच्या भांडणात लाठ्या काठ्या आणि कुऱ्हाडीचा वापर करण्यात आला. या भांडणात तिघांचा जागेवर मृत्यू झाला तर इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वासनवाडी येथे राहाणारे किसन पवणे व काशीनाथ पवणे या भावांमध्ये 10 एकर शेतीचा वाद सुरु होता. कोर्टात खटला देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र, या बाबतीत शुक्रवारी रात्रीच अ‍ॅड. कल्पेश किसन पवणे व डॉ.सचिन किसन पवणे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची फिर्याद बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. मात्र, यावरून दोघांवर हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. पण एक दिवस अगोदर तक्रार देऊन हा पूर्वनियोजित कट तर नाही ना, पोलिसांनी  संशय व्यक्त केला आहे. कल्पेश आणि सचिन या दोघांवर जिल्हा रुग्णालयात पोलिस बंदोवस्तात उपचार सुरु आहे.

या प्रकरणातील किसन पवणे हे फरार असून, त्यांचा पोलीस  शोध घेत आहेत. या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. मात्र, या प्रकरणावर बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे.

कल्याणमध्ये पेट्रोल पंपच बुडाला पाण्याखाली, 9 जणांची अशी झाली सुटका LIVE VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 04:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...