पिस्तूलचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न, चहार्डी-वेले मार्गावर पहाटे थरार

पिस्तूलचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न, चहार्डी-वेले मार्गावर पहाटे थरार

चोपडा तालुक्यातील चहार्डी-वेले मार्गावर पिस्तूलचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरोडेखोरांनी हवेत गोळीबार केला. बुधवारी पहाटे हा थरार पाहायला मिळाला.

  • Share this:

राजेश भागवत (प्रतिनिधी)

जळगाव, 5 जून- चोपडा तालुक्यातील चहार्डी-वेले मार्गावर पिस्तूलचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरोडेखोरांनी हवेत गोळीबार केला. बुधवारी पहाटे हा थरार पाहायला मिळाला.

मिळालेली माहिती अशी की, चहार्डी-वेले मार्गावर बुधवारी (ता. 5) रोजी पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास पिकअप महिंद्रा गाडी अडवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. गावठी कट्ट्याचा वापर करून व एक गोळी फायर करून शेळ्या मेंढ्यांचे व्यापारी यांचेकडील अंदाजित 3 ते 4 लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न झाला. मात्र पिकअप गाडीचा चालक गाडीतून वेल्याकडे पळत गेल्याने व शेजारील शेतात विनोद पाटील, लीलाधर भाईदास पाटील यांना हाक मारून बोलावल्याने मोठा अनर्थ टळला. लोक धावत येत असल्याचे पाहून दरोडेखोरांनी पळ काढला. साखर कारखान्याच्या मार्गाने दरोडेखोर मोटारसायकलवरून पसार झाले. दरोडेखोर चार जण असल्याचे समजले आहे. व्यापाऱ्यांना मारहाण झाल्याने व मुका मार लागल्याने उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

लिव्ह इन रिलेशन..मद्यपीने चिमुरड्याच्या छातीत मारली लाथ

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मद्यपी तरूणाने चार वर्षांच्या बालकाच्या छातीत लाथ मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गेल्या महिन्यात जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील यशोदा नगरात घडली होती.

महेश अशोक जाधव असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेत बालकाला जिल्हा रुग्णालयात सोडून संशयिताने पलायन केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला कैलास अशोक माळी (34, रा.शेंदुर्णी, ता. जामनेर) याच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.


VIDEO: मै लिखूँगी क्योंकि... IAS अधिकारी निधी चौधरींनी मांडली व्यथा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2019 03:39 PM IST

ताज्या बातम्या