हे वेळापत्रक पाहूनच आज प्रवास करा, मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील वाहतूक 2 तास बंद

आज म्हणजेच गुरुवारी मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील वाहतूक दोन तास बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर या मार्गावरून प्रवास करणार असाल तर वाहतूकीचं हे वेळापत्रक नक्की पाहा.

News18 Lokmat | Updated On: Jan 10, 2019 07:55 AM IST

हे वेळापत्रक पाहूनच आज प्रवास करा, मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील वाहतूक 2 तास बंद

रायगड, 10 जानेवारी : आज म्हणजेच गुरुवारी मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील वाहतूक दोन तास बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर या मार्गावरून प्रवास करणार असाल तर वाहतूकीचं हे वेळापत्रक नक्की पाहा. दुपारी 12 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजल्यापर्यंत पुण्याकडील वाहतूक बंद करण्यात येणार आहे.


त्यामुळे 12 ते 2 दरम्यान कोणत्याही वाहतूकीस एक्सप्रेसवरून धावणार नाही. त्यामुळे घरातून निघताना आधी वाहतूकीच्या वेळा जाणून घ्या. ऐन कामाच्या वेळेस मनस्ताप सहन करावा लागेल. ओव्हरहेड गंट्रीज बसवण्यासाठी वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


रसायनी आणि माडपमधील हद्दीत हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ऐन कामाच्यावेळी अशी 2 तास वाहतूक बंद केल्यामुळे आज एक्सप्रेस गर्दी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा आज प्रवास या वेळापत्रकानुसारच ठरवा.

Loading...


एक्सप्रेसवर 2 तास वाहतूक बंद करण्यात येणार असल्यामुळे इतर मार्गावर गाड्यांच्या लांबच रांगा लागतील. त्यात पुण्य़ाला जाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जुन्या मार्गावरदेखील थोडीफार वाहतूक कोंडी पाहायला मिळेल.


VIDEO: शौचासाठी रेल्वे ट्रॅकवर बसला, तेवढ्यात आली एक्स्प्रेस...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2019 07:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...