एसटी कर्मचारी संघटनेलाच संप मिटवायचा नाही-दिवाकर रावते

एसटी कर्मचारी संघटनेलाच संप मिटवायचा नाही-दिवाकर रावते

.एसटी कर्मचारी संघटनेला संप मिटवायचाच नाहीये, अशी प्रतिक्रियाही दिवाकर रावतेंनी दिली.

  • Share this:

17 आॅक्टोबर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या मागे काँग्रेसचा हात  असल्याचा आरोप परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी केलाय. एसटी कर्मचारी संघटनेला संप मिटवायचाच नाहीये, अशी प्रतिक्रियाही दिवाकर रावतेंनी दिली.

दिवाकर रावते यांनी आयबीएन लोकमतला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिलीये. आम्ही त्यांच्य़ाशी करार करायला तयार होते. पण राजकीय कारणांमुळे त्यांना करार करायचाच नव्हता, असं रावतेंनी सांगितलं. तर दुसरीकडे संपकरी एसटी कर्मचारी कामावर आले नाही तर कारवाई करणार, अशी घोषणा एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय महासंचालक रणजीत सिंह देओल यांनी केलीये.

मात्र, दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दिवाळीच्या निमित्त गावाकडे जाणाऱ्यांचे रात्रीपासून प्रचंड हाल होत आहेत. काल संध्याकाळी निघालेल्या काही गाड्या या बस स्थानकांवरच थांबवण्यात आल्या आणि प्रवाश्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलं. तर सकाळपासून सर्व मोठ्या आगारांमध्ये एसटी बसेस उभ्या आहेत. सहकुटुंब प्रवास, त्यात दिवाळीचं सामान, लोकांचे खूप हाल होत आहे. सातवा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2017 04:54 PM IST

ताज्या बातम्या