News18 Lokmat

मुख्यमंत्र्यांच्या होमटाऊनमध्ये ट्रान्स्पोर्टरचे अपहरण करून हत्या, कोंढाळीजवळ फेकला मृतदेह

राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमटाऊन असलेल्या नागपुरात एका ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. नागपूर अमरावती मार्गावर कोंढालीजवळ एक अज्ञात मिळाला मृतदेह मिळाला होता.

News18 Lokmat | Updated On: Apr 28, 2019 05:20 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या होमटाऊनमध्ये ट्रान्स्पोर्टरचे अपहरण करून हत्या, कोंढाळीजवळ फेकला मृतदेह

नागपूर, 28 एप्रिल- राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमटाऊन असलेल्या नागपुरात एका ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. नागपूर अमरावती मार्गावर कोंढाळीजवळ एक अज्ञात मिळाला मृतदेह मिळाला होता. त्यानंतर तपास केल्यावर हा मृतदेह बॉबी ऊर्फ चॅटि माकन याचा असल्याचा उघड झाले आहे.

बॉबी हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते आणि जरीपटका पोलिस ठाण्यात ते हरविल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी केली होती. मृत बॉबी यांची इनोव्हा गाडी (क्र. mh 31 cm 7979) बेवारस अवस्थेत जरीपटका पोलिस स्टेशनच्या मागे सापडली होती.

मृत बॉबी यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असू्न काटोल येथील ग्रामीण रुग्णालय पोस्टामार्टमसाठी नेण्यात आला आहे. प्रॉपर्टीच्या वादातून बॅाबी यांचे अपहरण आणि हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. नागपूरच्या जरीपटका भागातील जगत सेलिब्रेशन हॉलजवळ बॉबी माकन राहत होते आणि त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता.


...म्हणून भर रस्त्यात महिलेनं तरुणाला चपलेनं बडवलं, पाहा VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2019 04:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...