पुण्यात तृतीयपंथीयांनी 'अशी' साजरी केली दिवाळी

पुण्यात तृतीयपंथीयांनी 'अशी' साजरी केली दिवाळी

अतिशय भक्तिभावाने सगळ्यांनी पाडव्याची पूजा केली. गणेशपेठेतील ख्वाजासराह दय्यार किंवा मठ येथे दिवाळीचा उत्साह दिसत होता. तृतीयपंथीयांची दिवाळीही इतर सर्वांइतकीच आनंददायी असते.रंजीता नायक या ५४ वर्षांच्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरु परंपरेने जवळ जवळ ४० जण येथील मठात राहतात.

  • Share this:

पुणे, 20 ऑक्टोबर: सगळीकडे दिवाळीचा आनंद साजरा केला जातोय. लहान थोर सगळेच दिवाळीतील फराळाची मजा लुटत आहे. मात्र आपल्याच समाजातील तृतीयपंथियांनी देखील पुण्यात दिवाळीचा सण साजरा केला आहे.

अतिशय भक्तिभावाने सगळ्यांनी पाडव्याची पूजा केली. गणेशपेठेतील ख्वाजासराह दय्यार किंवा मठ येथे दिवाळीचा उत्साह दिसत होता.

तृतीयपंथीयांची दिवाळीही इतर सर्वांइतकीच आनंददायी असते.रंजीता नायक या ५४ वर्षांच्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरु परंपरेने जवळ जवळ ४० जण येथील मठात राहतात. यालाच दाय्यार देखील म्हणतात .दिवाळी , ईद सगळेच सण उत्साहाने साजरे केले जातात. 'दिवाली आयी'म्हणत सगळ्यांना शुभेच्छा दिल्या जातात.

दिवाळीच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देत सगळेजण मठाच्या बाहेर पडतात. वस्तीतील लोक आनंदाने त्यांना बक्षीसं देतात. आजी आजोबा यांना जेव्हा हे सगळे शुभेच्छा द्यायला जातात तेव्हा आजीला अश्रू अनावर झाले. सार वातावरण भावनिक झालं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2017 03:01 PM IST

ताज्या बातम्या