S M L

राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर आजपासून संपावर, आरोग्यसेवेवर परिणाम

...आणि म्हणून राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर आजपासून संपावर गेले आहेत.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 13, 2018 08:22 AM IST

राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर आजपासून संपावर, आरोग्यसेवेवर परिणाम

मुंबई, 13 जून : राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर आजपासून संपावर गेले आहेत. राज्य सरकारनं विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी संप पुकारला आहे.

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना सध्या सहा हजार रुपये विद्यावेतन मिळतं. पण हे पैसे पुरे नसल्याची मागणी करत हा डॉक्टरांकडून संप पुकारण्यात आला आहे. पण या संपाचा मोठा परिणाम हा आरोग्यसेवेवर होणार हे नक्की.

खरतंर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी 6 नाही तर तब्बल 11 हजार रुपये विद्यावेतन देण्याच्या 2015मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही आणि म्हणून डॉक्टरांनी हा संप पुकारला आहे.

पण वातावरणातील बदलांमुळे आणि ऐन पावसाळ्यात साथीच्या रोगांना उत येतो, अशात डॉक्टर संपावर गेल्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होणार आहेत. पण आता या सगळ्याची राज्य सरकार दखल घेणार का? आणि वेतनवाढीसंदर्भात काही ठोस भूमिका घेणार का हेच बघणं महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2018 08:16 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close