वाळूमाफियांनी 2 शाळकरी मुलांना चिरडले, संतप्त नागरिकांनी पेटवून दिले ट्रॅक्टर

वाळूमाफियांनी 2 शाळकरी मुलांना चिरडले, संतप्त नागरिकांनी पेटवून दिले ट्रॅक्टर

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने शाळेत जाणाऱ्या तीन मुलांना धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • Share this:

जळगाव, 21 फेब्रुवारी : अवैध वाळू उपसा करून बेदरकारपणे चालणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून दोन शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यातील आडगाव कासारखेडा फाट्यावर सकाळी ही घटना घडली आहे.

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने शाळेत जाणाऱ्या तीन मुलांना धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. अपघात झाल्यानंतर ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळाहून पळ काढला आहे. हा अपघात इतका भीषण होता की मुलांचे मृतदेह अक्षरशः छिन्नविच्छिन्न झाले होते.

या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने ट्रॅक्टर पेटवून दिला आहे. वाळू उपशावर बंदी असतानाही जळगाव जिल्ह्यात महसूल विभागाच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा चालत आहे.

वाळू उपसा करणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पण जिल्हा महसूल प्रशासन मात्र काहीच कडक कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढत चालला आहे.


VIDEO : भारत Vs पाकिस्तान, कुणाची किती ताकद!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 10:18 AM IST

ताज्या बातम्या