सोमवार ठरला घातवार; 3 अपघातांमध्ये 7 जणांचा मृत्यू, 87 जखमी

सोमवार ठरला घातवार; 3 अपघातांमध्ये 7 जणांचा मृत्यू, 87 जखमी

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात झालेल्या तीन अपघातांमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर जवळपास 87 जण जखमी झाले आहेत.

  • Share this:

सोलापूर, 6 मे : ट्रॅक्टर आणि ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. बार्शी-लातूर महामार्गावर पांगरी गावाजवळ  झालेल्या या अपघात 2 जण जागीच ठार झाले आहेत तर इतर 25 जण जखमी आहेत.

बार्शी-लातूर महामार्गावर रविवारी रात्री हा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्सने ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. त्यानंतर या ट्रॅक्टरमागे असणारी उसाची ट्रॉली पलटली. तसंच ट्रॅक्टरपासून वेगळी झाली.

या भीषण अपघात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अजून एक जण गंभीर जखमी आहे. तसंच इतर 25 जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी सोलापूर आणि बार्शी इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दुसरीकडे, कोरेगावमध्ये एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. एसटी बस झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात 56 प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यातील 15 प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

दरम्यान, लातूरमध्येही अपघाताची घटना घडली आहे. लग्नसमारंभासाठी जाताना सोनकांबळे कुटुंबीयांवर काळानं घाला घातला. अहमदपूर तालुक्यातील विळेगाव येथे एका लग्नसमारंभासाठी सोनकांबळे कुटुंबीय आपल्या पिकअप ऑटोमधून जात होते. त्यावेळी भरधाव वेगानं येणाऱ्या टेम्पोनं पिकअप ऑटोला धडक दिली. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

जळकोट तालुक्यातील धामणगाव पाटीजवळ हा भीषण अपघात झाला. ऑटोला टेम्पोनं धडक दिल्यानंतर टेम्पोचालक फरार झाला. यामध्ये पुष्पा ज्ञानोबा सोनकांबळे ( 55 वर्षे ) ज्ञानोबा सुदाम सोनकांबळे ( 60 वर्षे ) कांता बळीराम सोनकांबळे ( 60 वर्षे ) ऑटोचालक अरविंद बळीराम सोनकांबळे ( 25 वर्षे ) पूर्वी सोनकांबळे ( 5 वर्षे ) यांचा मृत्यू झाला. तर, सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर जळकोट येथील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. सध्या पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत. या अपघातानंतर विळेगाव येथे शोककळा पसरली आहे.


तेज बहादुर यांचा दारू पितानाचा VIDEO व्हायरल, मोदींना दिलं होतं आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2019 12:28 PM IST

ताज्या बातम्या