मुंबई,18 जुलै: गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली. मात्र पाऊस गेल्यामुळे उष्णतेत कमालीची वाढ झाली आहे. मुंबईकर सध्या उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. राज्यभरातच कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. 24 तासांत पुन्हा एकदा पाऊस येईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असला तरी पावसानं मात्र दडी मारली आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा.