तूर, मूग आणि उडदाच्या डाळीवरची निर्यातबंदी केंद्र सरकारने उठवली

तूरडाळ, उडीद आणि मूगडाळवरची निर्यातबंदी उठवण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा खूप मोठा दिलासा मानला जातोय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 16, 2017 10:21 AM IST

तूर, मूग आणि उडदाच्या डाळीवरची निर्यातबंदी केंद्र सरकारने उठवली

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : तूरडाळ, उडीद आणि मूगडाळवरची निर्यातबंदी उठवण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा खूप मोठा दिलासा मानला जातोय. कारण गेल्या दोन वर्षांत डाळींच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. यंदा देशातील डाळींचं उत्पादन जवळपास 200 लाख टनांवर पोहोचलं आहे.

तूरदाळ, उडीद आणि मूगदाळीच्या निर्यातीवरच बंदी असल्याने शेतकऱ्यांना भाव मिळत नव्हता. अशातच उडदाच्या डाळीचे उत्पादन 7 ते 10 लाख टनांवरून18 ते 20 लाख टनांपर्यंत पोहचलं होतं. मूग डाळीचे उत्पादनदेखील 15 लाख टनांवरुन 22 ते 24 लाख टनांवर पोहोचले. त्याच पार्श्वभूमिवर डाळींवरची ही निर्यातबंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळं आता डाळ निर्यात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भाववाढीच्या भीतीपोटी सरकार डाळ निर्यातीवरची बंदी उठवत नव्हतं. पण आता अखेर या प्रमुख डाळींवरची निर्यातबंदी उठवल्याने डाळउत्पादकांना चांगला भाव मिळणार आहे. व्यापाऱ्यांनीही या निर्णयाचं स्वागत केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2017 10:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...