कोथिंबीर नंतर टॉमॅटोचे भाव भडकले, कीड आणि रोगांचा फटका

भाव वाढले असले तरी अनेकदा व्यापारी आणि एजंट्स यांनाच फायदा मिळतो आणि कष्ट करणारा शेतकरी तसाच राहतो असं दिसून आलंय.

News18 Lokmat | Updated On: Jul 23, 2019 04:42 PM IST

कोथिंबीर नंतर टॉमॅटोचे भाव भडकले,  कीड आणि रोगांचा फटका

रायचंद शिंदे, जुन्नर 23 जुलै : कीड व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने टोमॅटो उत्पादनात घट झाली असून जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात  टोमॅटो क्रेट ची आवक निम्याने घटली आहे. त्यामुळे भावात वाढ होऊन 20 किलो च्या क्रेटला प्रतवारी नुसार लिलावात 600 ते 800 रुपयांचा भाव मिळत आहे. हंगामातील हा भाव उच्चांकी आहे.

मागील महिनाभरापासून ढगाळ वातावरण आहे त्यातच रिमझिम पाऊस असल्याने सूर्यप्रकाशाच्या अभावी टोमॅटोवर मोठ्या प्रमाणावर लालकोळी, फळावर काळे ठिपके, चिरटा या कीड व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे झाडांची वाढ खुंटली असून पाने पिवळी पडली असून टोमॅटो उत्पादनात मोठी घट झाली आहे.

पण याचा फायदा जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना झाला पाहिजे असं मत व्यक्त होतंय. अनेकदा व्यापारी आणि एजंट्स यांनाच फायदा मिळतो आणि कष्ट करणारा शेतकरी तसाच राहतो असं दिसून आलंय.

हप्ता दिला नाही म्हणून व्यवसाय बंद, महिलेने बाळालाच ठेवलं अधिकाऱ्याच्या टेबलवर

भाजीचं ऑनलाईन मार्केट असं आहे.

Loading...

तुम्ही तुमच्या घराचं वाणसामान कसं भरता ? घरात लागणारा भाजीपाला कुठून आणता ? सध्याच्या ऑनलाइन युगात या पद्धती आता खूप हायटेक झाल्या आहेत. याआधी किराणा सामानाची यादी वाण्याकडे देऊन सामान मागवणं किंवा मंडईत जाऊन भाजी आणणं हे आता जुनं झालं. आता जमाना ऑनलाइनचा आहे आणि अ‍ॅमेझॉनसारख्या कंपन्या यामध्ये आघाडीवर आहेत.

Bigg Boss Marathi : कॅप्टन शिवानीनं वीणा आणि हीनाला दिली अडगळीच्या खोलीची शिक्षा

सिअ‍ॅटलमधल्या एका गॅरेजमध्य सुरुवात करून अ‍ॅमेझॉनसारखी कंपनी जगातली सगळ्यात मोठी इ कॉमर्स कंपनी कशी बनली याबदद्लची कथा खूपच रंजक आहे. याच अ‍ॅमेझॉन कंपनीसाठी भाजीपाला आणि किराणा सामानाचा ऑनलाइन व्यापार सोपा असेल, असं आपल्याला वाटेल पण तसं नव्हतं.

अ‍ॅमेझॉन फ्रेश

भाजीपाल्यासारख्या नाशवंत मालाचा व्यापार करण्यामध्ये अनेक आव्हानं होती. त्यामुळे अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बोझेस हेही यात हात घालत नव्हते. पण 2007 मध्ये त्यांनी अ‍ॅमेझॉन फ्रेश लाँच केलं आणि या ऑनलाइन मार्केटचा नजारा बदलला. यासाठी देशभरामध्ये फळं आणि भाज्या गोठवून चांगल्या ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटर्सचीही आवश्यकता होती. त्यासाठी वेब डिझाइनही गरजेचं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 23, 2019 04:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...