S M L

पुणेमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी जाहीर

गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी पुणेमार्गे कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी मिळणार आहे. सरकारनं आज याची घोषणा केली.

Sachin Salve | Updated On: Aug 2, 2017 09:19 PM IST

पुणेमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी जाहीर

02 आॅगस्ट : गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी पुणेमार्गे कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी मिळणार आहे. सरकारनं आज याची घोषणा केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली, त्यात हा निर्णय झाला.

तसंच पुणे-सातारा तसंच मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम भूसंपादनाच्या प्रकियेमुळे रेंगाळलं आहे. भूसंपादनाच्या कामात नागरिक सहकार्य करीत नसल्यामुळे हे प्रकल्प रखडले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पनवेल ते इंदापूर चौपदरीकरणाचे काम मार्च २०१८ पर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यातील काम मार्च २०१९पर्यंत पूर्ण होईल, असं पाटील यांन‌ी स्पष्ट केलं.

रस्त्यांची अवस्था भयावह असून, ते सुधारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोकणात दर ५० किमीच्या अंतरावर खड्डे भरण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचा प्रयत्न आहे. पूल आणि रस्त्यांसाठी नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा सरकारचा मानस आहे, असंही पाटील म्हणाले.गणेशोत्सवासाठी पुणेमार्गे कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी मिळणार असल्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना सरकार पावलं असं म्हणावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2017 09:19 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close