News18 Lokmat

अडीच वर्षीय चिमुकलीच्या मृत्यूनं पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ, असंख्य प्रश्न उनुत्तरित

चिमुकलीचे अपहरण करुन तिचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 23, 2019 02:58 PM IST

अडीच वर्षीय चिमुकलीच्या मृत्यूनं पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ, असंख्य प्रश्न उनुत्तरित

पिंपरी चिंचवड, 23 जुलै : पिंपरी चिंचवडमध्ये अडीच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी (22 जुलै) संध्याकाळी ती घरातून बेपत्ता झाली होती. यानंतर तिचा शोध असताना घरातल्यांना तिचा मृतदेहच सापडला. या घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या चिमुकलीसोबत काही गैरप्रकार झाला आहे का? याची माहिती पोस्टमार्टेम अहवालातून समोर येईल. पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहिती अनुसार, पिंपरी चिंचवडच्या सांगवी भागात राहणारी अडीच वर्षीय चिमुकली सोमवार संध्याकाळी घराबाहेर गेली आणि त्यानंतर परतच आली नाही. कामगार वसाहतीमध्ये राहत्या घरातून बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी जवळपासच्या सर्वत्र परिसरात तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही.

(वाचा : कसाई मुलगा ! दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानं आईचा केला खून)

दरम्यान, तिचा मृतदेह मंगळवारी (23 जुलै) सकाळी तिचा मृतदेह पिंपळे सौदागर येथील मिलिटरी परिसरात आढळल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिस घटनास्थळी पोहोलचे आणि चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औंध रुग्णालयात नेण्यात आला. या चिमुकलीचे अपहरण करून तिचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

(वाचा : गर्भवती असताना सासरच्यांनी पोटावर मारल्या लाथा, सुसाईड नोट लिहून तरुणीची आत्महत्या)

Loading...

चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अद्याप शवविच्छेदन अहवालानंतरण तिच्या सोबतकाही गैरप्रकार झाला आहे का? आणि मृत्यु नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याची माहिती स्पष्ट होईल.

दोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 02:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...