निवडणुकीदरम्यान हवामानानेही बदलला रंग; अवकाळी पावसानंतर आता हा आहे अंदाज....

मुंबई, 17 एप्रिल : सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत असताना गेल्या दोन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे हवामानानेही बदलला रंग बदलला आहे. हवामान खात्याने 18 ते 20 एप्रिल दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात ढगाळ हवामानासह कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवला असून, विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे.

ram deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 03:20 PM IST

निवडणुकीदरम्यान हवामानानेही बदलला रंग; अवकाळी पावसानंतर आता हा आहे अंदाज....

मुंबई, 17 एप्रिल : सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत असताना गेल्या दोन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे हवामानानेही बदलला रंग बदलला आहे. प्रचंड उकाड्यानंतर अनेक ठिकाणी तापमानात चढ-उतार पहायला मिळाली. हवामान खात्याने 18 ते 20 एप्रिल दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात ढगाळ हवामानासह कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवला असून, विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान खात्याने राज्यात ढगाळ वातावरणासह कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवला असून, विदर्भात पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवली आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी म्हणजे 44.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

गेल्या दोन दिवसात राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामान होतं. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, आणि विदर्भात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारपीटही झाली. या पावसामुळे प्रचंड उकाडा सहन करणाऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी, शेतकऱ्यांच्या मात्र तोंडचा घास हिरावल्या गेला आहे.

राज्याच्या तापमानात चढ-उतार होत असून, दोन दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी 44 अंशांच्या पार गेलेले तापमान खाली घसरले आहे. चंद्रपूरसह, ब्रह्मपुरी, आणि नांदेडमध्ये तापमान 43 अंशांच्या पुढे असून, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह उर्वरित राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी तापमान 38 ते 41 अंशांच्या आसपास आहे. ढगाळ हवामान आणि पावसामुळे तापमानात चढ-उतार होत असून, त्यात 2 ते 3 अंशांनी अणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


Loading...

मान्सून हूल देणार की वेळेत येणार?

काही दिवसांपूर्वी स्कायमेटच्या अंदाजानुसार देशात मान्सून सरासरीच्या 93 टक्के पडणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. भारतातील मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव असेल असाही अंदाज स्कायमेटनं वर्तवला होता. मात्र, हवामान विभागाने देशात यंदा चांगला मान्सून होणार असल्याचं म्हटलं होतं. मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव कमी असू शकतो असंही सांगण्यात आलं होतं. हवामान विभागाच्या आतापर्यंतच्या अंदाजानुसार, 'अल निनोचा प्रभाव कमी असेल त्यामुळे यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात दिलासा मिळू शकतो.' यंदा सरासरीच्या 95 ते 104 टक्के सामान्यत: मान्सून येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


मान्सून चांगला झाला तर त्याचा परिणाम कोणत्या गोष्टींवर होणार?

1.आर्थिक विकास चांगला होईल

2.शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

3.अनेक ग्रामीण भागांमध्ये पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

4.चांगला पाऊस झाला तर उत्पादन चांगलं येईल आणि शेतकऱ्यांना, छोट्या व्यापाऱ्यांना फायदा होईल.

5. महामाई कमी होण्याची शक्यता

6. शेअर बाजारावर होऊ शकतो परिणाम

7. पाऊस चांगला झाला तर त्याचा फायदा बँक आणि फायनान्शियल सेक्टरलाही होणार आहे.

8.शेतकऱ्यांना आवश्यक ती उपकरण, वस्तू, खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे स्कायमेट आणि आयएमडी या दोन्हीचे अंदाज अगदी वेगवेगळे आहेत. दरम्यान, उन्हाचे आणि पाणी टंचाईचे चटके बसलेला शेतकरी आणि जनता पावसाची आतूरतेनं वाट पाहत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2019 03:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...