राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार, यासह वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार, यासह वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

दिवसभरातील 3 मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या

  • Share this:

मुंबई, 16 जून: आज दिवसभरातील 3 मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रविवार (16 जून) वर्ल्डकपमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या नवनिर्वाचित 18 खासदारांना घेऊन आज अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत.

1. रविवार (16 जून) वर्ल्डकपमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. क्रिकेटच्या मैदानातही पाकिस्तानला पुन्हा एकदा शह देण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. देशभरातून वेगवेगळ्या पद्धतीनं क्रिकेटप्रेमी भारतीय संघाला शुभेच्छा देत आहेत. या सामन्यावर पावसाचं सावट असल्यानं पावसाचं विघ्न टाळण्यासाठी भारतीय संघासह क्रिकेटप्रेमींची प्रार्थना सुरू आहे.

2. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या नवनिर्वाचित 18 खासदारांना घेऊन आज अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे काही खासदार शनिवारीच (15 जून) रात्री उशिरा अयोध्येत दाखल झाले आहेत. ठाकरे कुटुंबीयदेखील पहाटेच मुंबईहून अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ठाकरे कुटुंबीय अयोध्येत पोहोचतील, अशी माहिती आहे. यानंतर सकाळी 11 वाजण्याच्या उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील. लोकसभा निवडणूक 2019मध्ये विजयी झालेल्या सर्व खासदारांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज राम जन्मभूमीत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.

3. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. ज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे, सुरेश खाडे, बाळा भेगडे, परिणय फुके यांना संधी देण्यात आली आहे. आदिवासी मंत्री विष्णू सावरा, दिलीप कांबळे, राजकुमार बडोले या मंत्र्यांचाही पत्ता कापण्यात आलाय. सकाळी 11 वाजता राजभवनाच्या प्रांगणात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

4. आज वटपौर्णिमा असल्यानं महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. वडाची पूजा महिला पारंपरिक पद्धतीनं सजून बाहेर पडत आहे. आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी वडाकडे प्रार्थना करतात. त्यामुळे रिमझिम पाऊस असला तरीही महिलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

5. आज फादर्स डे असल्यानं सोशल मीडियावर मेसेजचा अक्षरश: पाऊस सुरू आहे. जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. याची सुरुवात विसाव्या शतकात करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 08:26 AM IST

ताज्या बातम्या