S M L

Morning Alert: या आहेत आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या

आजच्या महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढवा.

News18 Lokmat | Updated On: Oct 20, 2018 07:38 AM IST

Morning Alert: या आहेत आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या

उत्तर भारतात दसरा शुक्रवारी साजरा झाला. जल्लोषात रावण दहन सुरू असताना अमृतसरवासियांसाठी शुक्रवारची रात्र काळरात्र ठरली. ज्या मैदानावर जल्लोष होता, फटाक्यांची आतषबाजी होती त्या मैदानाचं रूपांतर स्मशानात झालं. सर्वत्र आक्रोश पसरला, लोकांच्या किंकाळ्या, जीवाच्या आकांताने पळणारे लोक असं ह्रदय पिळवटून टाकणारं ते दृष्य होतं.

सविस्तर वाचा...

महिलेनं 'व्हिडीओ कॉल'वर बघितली रेल्वे अपघाताची LIVE दृश्य!व्हिडिओ पाहा...

शिर्डी इथं झालेल्या जाहीर सभेत मोदींच्या हस्ते 20 हजार लाभार्थ्यांना घरकुलाचं वाटप करण्यात आलं. यावेळी मोदींनी दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या राज्यातील जनतेला दिलासा देणारी घोषणा केली. त्यांनी दुष्काळ निवारणासाठी मदत कमी पडू देणार नाही, वाट्टेल तितका निधी देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.

सविस्तर वाचा...

Loading...
Loading...

खोटे बोलण्यात पंतप्रधानांचा हात कोणी धरू शकत नाही, हे देशातील जनतेला माहित आहे. मात्र साईबाबांच्या शिर्डीत येऊन पंतप्रधान खोटे बोलले याचे दुःख माझ्यासारख्या देशातील साईभक्तांना झाले अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय.

सविस्तर वाचा...

महाराष्ट्र सरकारनं डीजे आणि डॉल्बी सिस्टीमवर लावलेली बंदी कोर्टानं कायम ठेवली आहे. त्यामुळे तूर्तास डीजेचा आवाज बंदच राहणार आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव संपन्न झाल्यामुळे हायकोर्टानं डीजेवरील बंदी उठवावी अशी मागणी डीजे मालकांनी एका याचिकेद्वारे कोर्टाकडे केली होती.

सविस्तर वाचा...

उद्धव ठाकरेंना मुंबईत बाळासाहेबांचं स्मारक बांधता आलं नाही. आधी त्यांनी बाळासाहेबांच स्मारक बांधावं आणि मग राम मंदिराविषयी बोलावं. निवडणुका आल्यामुळेच शिवसेनेला रामाची आठवण झाली अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

सविस्तर वाचा...

 

ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बारमध्ये अश्लील चाळे, छुपा VIDEO आला समोर

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 20, 2018 07:33 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close