S M L

न्यूज18 लोकमतच्या मुक्ता सन्मान पुरस्कारांचं आज वितरण

महाराष्ट्रभरातून आलेल्या 100 नामांकनांमधून तज्ञ परिक्षकांच्या निवड समितीनं पुरस्कारांसाठी मान्यवरांची निवड केली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 27, 2018 11:53 AM IST

न्यूज18 लोकमतच्या मुक्ता सन्मान पुरस्कारांचं आज वितरण

मुंबई, 27 मार्च : न्यूज18 लोकमतच्या मुक्ता पुरस्कारांचं आज वितरण होणार आहे. महाराष्ट्रातल्या 9 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान या सोहळ्यात होणार आहे. शेती, प्रशासन, सेवा, अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञान चाकोरीबाहेरचं काम, सामाजिक संस्था, जन आंदोलन आणि जीवनगौरव या श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

महाराष्ट्रभरातून आलेल्या 100 नामांकनांमधून तज्ञ परिक्षकांच्या निवड समितीनं पुरस्कारांसाठी मान्यवरांची निवड केली आहे. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी आणि भाग्यश्री लिमये यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

दादरमधल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. आपली सगळ्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला प्रार्थनिय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2018 09:30 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close