संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची आजपासून सुरुवात

संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची आजपासून सुरुवात

दुसरीकडे अमदार बच्चू कडू अमरावतीमध्ये आंदोलन करणार

  • Share this:

राज्यातील विरोधकांनी विविध प्रश्नांवर एकत्र येत संघर्ष यात्रा सुरू केली आहे. या यात्रेचा तिसरा टप्पा कोल्हापुरातून आजपासून (मंगळवार) सुरु होणार आहे. तर दुसरीकडे अमदार बच्चू कडू अमरावतीमध्ये आंदोलन करणार आहेत.

भुदरगड तालुक्यातील मुधाळ तिट्टा, कोल्हापूर शहरातला दसरा चौक आणि जयसिंगपूर या ठिकाणी विरोधकांची सभा ठेवण्यात आली आहे.

दोन्ही आंदोलनात तुरीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या तुरीबाबतच्या अडमुठेपणामुळे विरोधकांना आता चांगलंच खाद्य मिळालं आहे. त्यामुळे, आता अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यावर काय बोलतात, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2017 09:31 AM IST

ताज्या बातम्या