आज सुकाणू समितीचं राज्यभर चक्काजाम आंदोलन

आज सुकाणू समितीचं राज्यभर चक्काजाम आंदोलन

नागपुरातही हे आंदोलन होणार असून प्रहार आणि जय जवान, जय किसान या दोन्ही संघटना एकत्र येत आंदोलनाची मशाल हाती घेणारेत.

  • Share this:

14 आॅगस्ट : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा केलीय. नागपुरातही हे आंदोलन होणार असून प्रहार आणि जय जवान, जय किसान या दोन्ही संघटना एकत्र येत आंदोलनाची मशाल हाती घेणारेत.

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेतलेली नाही. यावर विचार करून सुकाणू समितीने आजपासून पुन्हा आरपारची लढाई लढण्याची भूमिका घेतलीय, तर बुलडाणा जिल्ह्यात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन आणि परभणी जिल्ह्यात 34 ठिकाणी चक्का जाम करण्यात येणार आहे.

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उद्या ध्वजारोहण करू देणार नाही असा इशारा सूकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी दिलाय.कोल्हापूरमध्ये राज्यमंत्री खोत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण होणार आहे. त्या कार्यक्रमादरम्यान सदाभाऊ खोत यांना रोखणार असल्याची माहिती मिळतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2017 09:56 AM IST

ताज्या बातम्या