आज लक्ष्मीपूजनाची लगबग;पावणेसहा ते सव्वा आठ पर्यंतचा मुहुर्त

आज लक्ष्मीपूजनाची लगबग;पावणेसहा ते सव्वा आठ पर्यंतचा मुहुर्त

संध्याकाळी 5 वाजून 44 मिनिटांपासून सव्वा आठ पर्यंतचा आज मुहुर्त आहे.

  • Share this:

19 ऑक्टोबर: आज कार्तिकी अमावस्या अर्थात लक्ष्मीपूजन.त्यामुळे देशातील छोट्या छोट्या व्यापाऱ्यापासून देशातले शेअर मार्केटपर्यंत सगळीकडे आज लक्ष्मीची पूजा केली जाते.संध्याकाळी 5 वाजून 44 मिनिटांपासून सव्वा आठ पर्यंतचा आज मुहुर्त आहे.

धनाची देवता लक्ष्मीची पूजा करून पुढचं वर्षभर घरोघर धन आणि धान्य भरभरून मिळू दे अशी प्रार्थना करण्याचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन. तसंच आज मुंबई शेअर बाजारात खास मुहूर्ताचं ट्रेडिंग केलं जातं. आजच्या व्यवहाराला शेअर बाजारात खास महत्त्व आहे. व्यापाऱ्यांच्या नव्या वर्षालाही आज सुरुवात होईल. तर गेल्यावर्षी झालेली नोटाबंदी आणि त्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेत झालेले मोठ्या प्रमाणातले बदल या पार्श्वभूमीबद्दल आजच्या शेअर बाजारातील सौद्यांना महत्त्व आहे. तर व्यापारीसुद्धा आपल्या व्यवसायात अधिकाधिक बरकत येऊ दे अशी लक्ष्मीकडे प्रार्थना करतात. आज लक्ष्मी संध्याकाळी 5 वाजून 44 मिनीटांपासून ते रात्री सव्वा आठपर्यंत पूजनाचा मुहूर्त आहे. व्यापारी साधारणपणे जास्तीतजास्त उशीराचा मुहूर्त पूजेसाठी धरतात.

सध्या देशातील आर्थिक मंदीची स्थिती सुधारते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2017 07:15 PM IST

ताज्या बातम्या