शेतकऱ्यांचा महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेनेसह शेकापनेही आजच्या संपात उडी घेतलीय, मुंबई वगळता संपूर्ण राज्यात या बंदची हाक देण्यात आलीय, सरकारमधील दोन घटकपक्षांनी संपात सहभाग घेतल्यानं भाजपची चांगलीच कोंडी झालीय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2017 03:47 PM IST

शेतकऱ्यांचा महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

05 जून : मुंबई वगळता आज महाराष्ट्र बंदची हाक सगळीकडे दिलीय. संपात फुट पडल्याने आजचा महाराष्ट्र बंद यशस्वी करून दाखवण्याचा चंग काही संघटनांनी बांधलाय विशेषतः स्वाभिमानी शेतकरी संघटना आजच्या संपावर ठाम आहे. अशातच शिवसेनेसह शेकापनेही आजच्या संपात उडी घेतलीय, मुंबई वगळता संपूर्ण राज्यात या बंदची हाक देण्यात आलीय, सरकारमधील दोन घटकपक्षांनी संपात सहभाग घेतल्यानं भाजपची चांगलीच कोंडी झालीय.  नाशिक, पुणतांबा इथल्या शेतकरी संपावर ठाम आहेत. रात्रीही राहुरीत दुधाचा टँकर पेटवून देण्यात आलाय.

कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी आंदोलन तीव्र झालं आहे. पेठ वडगाव परिसरातील प्रसिद्ध जनावरांचा बाजार सुरू ठेवल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. व्यापारपेठ सुरू ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना कार्यकर्त्यानी चांगलाच चोप दिला. तर काही कार्यकर्त्यानी बाजार समितीच्या कार्यालयाला टाळे ठोकलं.

कोल्हापूरमध्ये शिवसेनेनं महामार्ग रोखलाय. पुणे बंगलोर महामार्गावर शिवसेनेनं आंदोलन केलंय.  शेकडो शिवसैनिक रस्त्यावर उतरले. महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेनाही सहभागी झालीये, या रास्ता रोकोमुळे हायवेमुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प हायवेला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात.

अहमदनगर जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय.अनेक तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळला गेलाय.जिल्ह्यातील दूध संकलन केंद्र बंद राहणारेत. तर बाजार समितीचे व्यवहारही ठप्प राहतील. अनेक गावातील आठवडे बाजारही बंद असतील.

कोपरगाव ,नेवासे, राहुरी, संगमनेर, राहाता ,श्रीरामपूर येथे बंदला पाठिंबा आहे. शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, व्यापारी असोसिएशन, भाजीपाला खरेदी संघाचाही या बंदला पाठिंबा आहे.बाळासाहेब थोरातांची राजहंस डेअरी आज बंद राहणारे. टीकेनंतर थोरातांनी डेअरीचे संकलन केले बंद. दरम्यान, आंदोलन दडपण्यासाठी पोलीस बळाचा वापर करत असल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले  यांनी केलाय.

Loading...

बंदला मनमाड, येवला, चांदवड,नांदगाव तालुक्यात  उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सर्व ठिकाणी व्यापारी दुकानदारांनी कडकडीत बंद पाळून शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.

परभणी,मानवत,पाथरी,सेलू, सर्वच तालुके बंदमध्ये समील आहेत. शेतकरी कर्जमाफीच्या सर्वत्र जोरदार घोषणा दिल्या जातायत.

कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील कौलव इथे भाजप वगळता सर्व पक्षीय रास्ता रोको रास्ता रोको करून आंदोलनाला  पाठिंबा दिला.

आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नाशिक जिल्ह्यात चांगला प्रतिसाद आहे.जिल्ह्यातील सर्व 19 बाजारसमित्या आजही बंद असून येवला,मनमाड,दिंडोरी या तालुक्यात तर व्यापारी संघटनांनी या बंदला पाठिंबा दिलाय. दरम्यान पोलीस बंदोबस्तात दूध आणि भाजीपाला पाठवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. नेमकं आज दिवसभरात काय होतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2017 09:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...