Elec-widget

नांदेडचा प्रचार आज संपणार,मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष

नांदेडचा प्रचार आज संपणार,मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष

नांदेड महानगरपालिकेसाठीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे.. भाजप आज बड्या नेत्यांची फळीच नांदेडमध्ये उतरवणार आहे. खुद्द मुख्यमंत्री 2 सभा घेणार आहेत.

  • Share this:

09 आॅक्टोबर : नांदेड महानगरपालिकेसाठीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे.. भाजप आज बड्या नेत्यांची फळीच नांदेडमध्ये उतरवणार आहे. खुद्द मुख्यमंत्री 2 सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या असभ्य भाषेतल्या टीकेला ते काय उत्तर देतात ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

त्याचबरोबर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महिला, बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेही सभा घेणार आहेत. शिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा रोड शोही होणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपनं राज्यात अनेक महानगरपालिका आणि नगरपालिका जिंकल्या आहेत.

अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला असलेलं नांदेड जिंकायचाही भाजपचा प्रयत्न आहे.पण चव्हाण आतापर्यंत आपला गड राखून आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2017 10:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com