S M L

सिंदखेड नगरीत जिजाऊ जन्मोत्सवाचा सोहळा, अरविंद केजरीवाल यांनीही केलं अभिवादन

मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात आज माँ जिजाऊंचा जन्मोस्तव साजरा होतोय. सकाळी 7 वाजताची जिजाऊंची आरती नगरपालिकेतर्फे पार पडली.आज सिंदखेड राजा नगरीत लाखोंचा जनसमुदाय एकत्र येणार असून जिजाऊंना वंदन करण्यासाठी अनेक दिग्गज मातृतीर्थ सिंदखेड नगरीत दाखल होतायत.

Sonali Deshpande | Updated On: Jan 12, 2018 04:46 PM IST

सिंदखेड नगरीत जिजाऊ जन्मोत्सवाचा सोहळा, अरविंद केजरीवाल यांनीही केलं अभिवादन

12 जानेवारी : मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात आज माँ जिजाऊंचा जन्मोस्तव साजरा होतोय. सकाळी 7 वाजताची जिजाऊंची आरती नगरपालिकेतर्फे पार पडली.आज सिंदखेड राजा नगरीत लाखोंचा जनसमुदाय एकत्र येणार असून जिजाऊंना वंदन करण्यासाठी अनेक दिग्गज मातृतीर्थ सिंदखेड नगरीत दाखल होतायत.

पहाटेपासूनच मोठ्या संख्येनं शिवप्रेमी सिंदखेड राजामध्ये जिजाऊंना वंदन करण्यासाठी दाखल होताना दिसतायत. शिवप्रेमींची आज होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवलाय.

दिल्लीचे मुख्यमंत्री  अरविंद केजरीवाल यांनी जिजाऊ जन्मस्थळावर जाऊन जिजाऊंना अभिवादन केले. केजरीवाल यांची आज बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा इथं सभा आयोजित करण्यात आलीये. या महाराष्ट्र संकल्प सभेसाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झालेत. जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधून या सभेचे आयोजन  करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 12, 2018 01:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close