मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक समिटचा शेवटचा दिवस; नाणार रिफायनरीचं काय होणार?

मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक समिटचा शेवटचा दिवस; नाणार रिफायनरीचं काय होणार?

मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक समिटचा आज शेवटचा दिवस आहे. कालच्या दिवशी 5 लाख कोटी रुपयांचा गुंतवणूक करार करण्यात आला आहे.

  • Share this:

20 फेब्रुवारी : मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक समिटचा आज शेवटचा दिवस आहे. कालच्या दिवशी 5 लाख कोटी रुपयांचा गुंतवणूक करार करण्यात आला आहे. आज आणखी काही नवीन करार होणं बाकी आहे . यात सर्वात महत्वाचा गुंतवणूक करार म्हणजे रत्नागिरी नानार रिफायनरीचा असणार आहे. या गुंतवणूक करारावर सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबरोबरच आज वॉटर कंझर्वेशन, महिला उद्योजिका आणि मुंबई शहर व्यवस्थापन हे सेमिनार महत्त्वाचे असणार आहेत.

दुपारी 5 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक समिट 2018 ची सांगता होणार आहे.

नाणार रिफायनरीसंदर्भात माहिती जाणून घेऊयात

- रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर जवळ रिफायनरीचा प्रकल्प प्रस्तावित

- भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्थान पेट्रोलियमचा संयुक्त उपक्रम

- 3 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित

- प्रतिवर्षी 60 मिलियन टन उत्पादनाचं लक्ष्य

- प्रकल्पासाठी 15 हजार एकर जमीन संपादनाची गरज

- 1000 एकर मध्ये स्टोरेज टँकचा प्रस्ताव

- 2023 पर्यंत रिफायनरीचं काम पूर्ण करण्याचं टार्गेट

- 15 ते 20 हजार लोकांना थेट रोजगार मिळेल असा सरकारचा दावा

- अप्रत्यक्षरीत्या 1 लाख रोजगार निर्मितीचा दावा

दरम्यान, मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स या परिषदेच्या माध्यमातून राज्यात 12 लाख कोटींची गुंतवणूक होत असल्याची माहिती सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 43 सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी एचएसबीसी, मायक्रोसॉफ्ट, जेएनपीटी आणि एसबँकेसह अनेक कंपन्यांशी सामंजस्याचे करार करण्यात आले आहेत.

भारतीय बनावटीचं विमान बनवणारे मराठमोळे कॅप्टन अमोल यादव यांच्याशी राज्य सरकारनं 35 हजार कोटींचा करार केला आहे. त्यांच्या विमान कारखान्यासाठी पालघरमध्ये एमआयडीसीमार्फत विमान कारखान्यासाठी जागा देण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2018 10:37 AM IST

ताज्या बातम्या