नितीन गडकरींच्या हस्ते सावित्री नदीवरील पुलाचं उद्घाटन

गेल्या वर्षी २ आॅगस्ट रोजी सावित्री नदीवरचा ब्रिटिशकालीन जुना पूल, मुसळधार पावसात वाहून गेला होता.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2017 02:54 PM IST

नितीन गडकरींच्या हस्ते सावित्री नदीवरील पुलाचं उद्घाटन

05 जून : अपघातामुळे चर्चेत आलेला रायगडच्या महाडमधील सावित्री नदीवरील पूल पुन्हा नव्याने उभा राहिला आहे.  केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नव्या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. विशेष म्हणजे पुलाचं काम पूर्ण करण्यासाठी १८० दिवसांची (सहा महिने) मुदत देण्यात आली असताना पाच महिन्यांमध्येच हे काम पूर्ण झालं आहे.

'या पूलाची देखभाल होऊन आवश्यक ती काळजी घेण्याची जबाबदारी माझ्या मंत्रालयाची होती.' असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

 

गेल्या वर्षी 2 आॅगस्टला भर पावसात हा पूल वाहून गेला होता. या दुर्घटनेत दोन एसटी बस आणि एक तवेरा कार बुडाल्या होत्या. या गाड्यांमधील सर्व ४० प्रवाशांचा त्यामुळे मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेनंतर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ६ महिन्यांत नवीन पूल बांधण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज हा पूल बांधून तयार झालाय.

Loading...

यावेळी नितीन गडकरी यांनी 'मी कोकणच्या जनतेला शब्द देतो की २०१८ डिसेंबरपर्यंत फोर लेन सिमेंट काँक्रिटचा रस्ता बांधून पूर्ण करेन,' असंही सांगितलं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2017 10:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...