कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आज होणार जमा, सहकारी बँका राहणार सुरू

कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आज होणार जमा, सहकारी बँका राहणार सुरू

कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी, राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँका, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा आज सुरू राहणार आहेत.

  • Share this:

10 डिसेंबर : शेतकरी कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याच्या कामाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी, राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँका, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा आज सुरू राहणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 41 लाख शेतकऱ्यांच्या खात्यासाठी 19 हजार 537 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे.

शेतकरी आंदोलनानंतर सरकारनं कर्जमाफी तर केली. पण शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसे येणार, यावर उलटसुलट चर्चा सुरू होत्या. आज खात्यात पैसे पडल्यानंतर शेतकऱ्याला दिलास मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2017 11:15 AM IST

ताज्या बातम्या