S M L

आज छत्रपती शिवाजी महाराजांची 338वी पुण्यतिथी, किल्ले रायगडावर कार्यक्रमांचं आयोजन

यावर्षी रायगडावरील राज सदरेत प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Mar 31, 2018 09:19 AM IST

आज छत्रपती शिवाजी महाराजांची 338वी पुण्यतिथी, किल्ले रायगडावर कार्यक्रमांचं आयोजन

31 मार्च : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३३८व्या पुण्यतिथी निमित्ताने किल्ले रायगडावर हजारोंच्या संख्येने शिवभक्त दाखल झालेत. किल्ले रायगडावर छत्रपती  शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावर दीप प्रज्वलन करण्यात आलंय. रायगड स्मारक समिती तर्फे दर वर्षी रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन यावेळी केलं जातं.

यावर्षी रायगडावरील राज सदरेत प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आहेत. थोड्याच वेळापूर्वी त्यांचं रायगडावर आगमनही झालं. जगदीश्वर मंदीरात हनुमान पूजा करून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करतील. त्यानंतर राज सदरेत शिवरायांच्या मूर्तीचं पूजन होणार आहे. अभिवादन कार्यक्रम झाल्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषण राज सदरेत होणार आहे.रायगड स्मारक समितीतर्फे दरवर्षी स्वराज्यासाठी योगदान देणाऱ्या एक सरदार कुटुंबाच्या वारसांचा सत्कार करण्यात येतो. यावर्षी वीर सरदार कान्होजी जेधे यांच्या वारसांचा सत्कार होणार आहे. तसंच लष्करात मेजर जनरल पदावर कार्यरत असणारे मनोज ओक यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी बाराच्या सुमारास राज सदरेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक समाधी स्थळापर्यंत निघणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 31, 2018 09:19 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close