S M L

आज राज्यभरात रामनवमीचा उत्साह, शोभायात्रेसाठी सजली शहरं

आज राज्यभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय. चैत्र शुद्ध नवमी हा चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस असून, या तिथीस भगवान रामाचा जन्म झाला.

Sonali Deshpande | Updated On: Mar 25, 2018 09:10 AM IST

आज राज्यभरात रामनवमीचा उत्साह, शोभायात्रेसाठी सजली शहरं

25 मार्च : आज राज्यभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय. चैत्र शुद्ध नवमी हा चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस असून, या तिथीस भगवान रामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करण्यात येतो. राज्यभरातल्या राम मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. वडाळातल्या काळाराम मंदिरातही सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी रिघ लावलीय.

रामनवमी निमित्त आज नाशिक शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्व राममंदिरांमध्ये रामजन्मोत्सव, मिरवणुका आणि कीर्तन, आणि प्रवचन यांची रेलचेल पहायला मिळणार आहे.

आज नागपुरात भगवान श्रीराम जन्मोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचलाय. शहरातील  रामभक्त यासाठी सज्ज झाले आहेत. पोद्दारेश्वर राममंदिर आणि रामनगरच्या राममंदिरातून दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून रामनवमीच्या या भक्तिमय वातावरणात उपराजधानीला पुन्हा एकदा अयोध्येचे रूप प्राप्त होणार आहे. यानिमित्त मंदिरात स्थापन झालेले घट विसर्जित केले जाणार असून विविध राममंदिरात विशेष आयोजन केले जाणार आहे.शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवाला कालपासून सुरूवात झाली आहे.. पंढरपुर प्रमाणे रामनवमीच्या उत्सवाला राज्यभरातून शेकडो पायी दिंड्या शिर्डीला येत असतात त्याचबरोबर हजारो साईभक्त आज शिर्डीत साईदर्शनासाठी दाखल झाले आहेत...साईबाबांच्या हयातीत सुरू झालेला रामनवमी उत्सव आजही दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय.

रत्नागिरी जिल्ह्यातील पाजपंढरी गावात राम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर रामाचं सुरेख मंदिर आहे. दरवर्षी या ठिकाणी मोठी यात्रा भरते. या उत्सवाला कोकणातील रामभक्त मोठ्या संख्येनं हजेरी लावतात. प्रामुख्याने कोळी बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात राम जन्मोत्सव साजरा होतो. दरवर्षी एका मंडळाला उत्सवाचा मान असतो या वर्षी जुनी कुलाबकर मंडळी यांना मान दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2018 09:10 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close