News18 Lokmat

आज आणि उद्या राज्यात गारपिटीचा अंदाज; पिकांना फटका बसण्याची शक्यता

याचा फटका नाशिकच्या द्राक्षांपासून, जळगावच्या केळीपर्यंत आणि विदर्भातल्या संत्रा, मोसंबीच्या पिकांना बसण्याची शक्यता आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Feb 23, 2018 08:12 AM IST

आज आणि उद्या राज्यात गारपिटीचा अंदाज; पिकांना फटका बसण्याची शक्यता

23 फेब्रुवारी : हवामान विभागानं आज आणि उद्या उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात पुन्हा गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. याचा फटका नाशिकच्या द्राक्षांपासून, जळगावच्या केळीपर्यंत आणि विदर्भातल्या संत्रा, मोसंबीच्या पिकांना बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गारपिटीचा फटका या दोन्ही भागातल्या काढणील्या आलेल्या रब्बी पिकांनाही बसणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी जेवढी खबरदारी घेता येईल तेवढी खबरदारी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे.

हवामान विभागानं गारपिटीचा इशारा दिला असला तरी दुसऱ्यांदा होणारी ही गारपिट तीव्रतेनं मागच्या गारपिटीपेक्षा कमी असेल अशी दिलासादायक माहिती नागपूरच्या हवामान विभागानं दिली आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे विदर्भातल्या गहू आणि इतर पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिकं योग्य ठिकाणी सुरक्षीत ठेवावी असं आवाहनच हवामान खात्यानं केलंय. उत्तर महाराष्ट्रात विशेषता द्राक्ष, कांदा पट्ट्यात म्हणजे नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, त्याचबरोबर धुळे, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यातही गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यामुळं द्राक्ष आणि कांदा उत्पादकांची मोठी तारांबळ उडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

गेल्या गारपिटीमुळे विदर्भातील शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय. आता या गारपिटीतून तरी त्यांच्या पिकांचं संरक्षण होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 23, 2018 08:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...